Sant Tukaram Palkhi Sohala (Photo Credits: Commons.Wikimedia)

यंदा 2 वर्षाच्या खंडानंतर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) दिवशी पायी वारी पंढरपूरला (Pandharpur)  जाणार आहे. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात त्यामुळे यावारीचं एक विशेष आकर्षण असते. यंदा 10 जुलै दिवशी पार पडणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू (Dehu) मधून संत तुकाराम महाराजांची (Sant Tukaram Palkhi) आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dyaneshwar Palkhi) ही आळंदी (Aalandi) येथून प्रस्थान ठेवणार आहे.

यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. पालखी प्रस्थानाची तारीख जाहीर

तुकाराम महाराजांच्या पालखीतील महत्त्वाचे दिवस

पालखी प्रस्थान - 20 जून 2022

पहिलं गोल रिंगण - 30 जून 2022 (बेलवंडी)

दुसरं गोल रिंगण - 2 जुलै 2022 (इंदापूर)

तिसरं गोल रिंगण - 5 जुलै 2022 (अकलूज माने विद्यालय)

पहिलं उभं रिंगण - 6 जुलै 2022 (माळीनगर)

दुसरं उभं रिंगण - 8 जुलै 2022 (बाजीराव विहीर)

तिसरं उभं रिंगण - 9 जुलै 2022 (पादुका आरती)

तुकारामांच्या पालखीमध्ये 'रिंगण' हे विशेष आकर्षण असते. यामध्ये 'गोल रिंगण' आणि उभे रिंगण अशा दोन प्रकारचे रिंगण पाहता येतात. गोल रिंगणामध्ये पालखीभवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्‍या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्‍यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्‍यांची गर्दी असते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.

यंदा कोरोना संकट आटोक्यात असल्याने पायी वारी साठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकर्‍यांमध्ये उत्साह आला आहे. अनेक जण आता तयारीला देखील लागले आहेत.