आषाढी एकादशीचं (Ashadhi Ekadashi) प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यात एक विशेष महत्व आहे. या दिवशी प्रत्येक विठ्ठल (Vitthal) भक्त विठूरायाच्या नावाने एकादशीचा उपवास ठेवत आपलं विठूराविषयी प्रेम दर्शवतात. विठूराया हे महाराष्ट्रचं (Maharashtra) दैवत, दैवताची आषाढ एकादशी म्हणजे विठू भक्तांचा मोठा सण आणि सण सजावटीविना साजरा करणं म्हणजे अश्यक्यचं. आषाढ एकादशीला विठू आपल्या प्रत्येक भक्ताच्या भेटीला येतो आणि या एकादशीला (Aashadhi Ekadashi) विठूरायाच्या स्वागतासाठी तुम्ही तुमच्या घराची सजावट कशी करायची या विषयीच्या काही खास टीप आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरापासून गल्लीबोळ्यातील विठ्ठल मंदिरं देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने उजळून निघतात. यंदा 10 जुलै, रविवारी आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) साजरी केली जाणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने वारकरी मित्रांना, विठू माऊलींच्या भक्तांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्त घराच्या सजावटीतला महत्वाचा भाग म्हणजे रांगोळी. विठूरायच्या स्वागतासाठी काही खास रांगोळी आणि त्या रेखाटायच्या अगदी सोप्या टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. (हे ही वाचा:-Bendur Festival : काय आहे बेंदूर सण? जाणून घ्या महाराष्ट्रातील या अनोख्या सणाचं महत्व आणि वैशिष्ट)
सावळ्या विठूचं शब्दसुमनांत स्वागत :-
पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल आणि रेखाटावा विठ्ठल :-
आषाढ एकादशी स्पेशल ठिपक्यांची रांगोळी :-
डोळ्याचं पारणं फेडणार विठू माऊलीचं रुप :-
अबिर गुलाल उधळीत रंग नाथाघरी नाचे माझा सखा पांढूरंग :-