Ashadhi Ekadashi 2019 Marathi Messages: आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर पंढरीच्या वारीचे चित्र उभे राहते. वर्षभरात येणाऱ्या इतर 24 एकादशांपेक्षा या एकदाशीला विशेष महत्त्व आहे. भागवत धर्मात हिला 'महाएकादशी' असे म्हटले जाते. नामस्मरण आणि भक्ती हा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग भागवत धर्मात सांगितला आहे. तसंच भागवत धर्मात जातीभेद मानत नसल्याने सर्व जाती, पंथांचे लोक एकत्र येऊन पंढरीची वारी करतात. तुकाराम, नामदेव, जनाबाई या संतांनी विठ्ठलभक्तीची महती लोकांपर्यंत पोहचवली आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विठ्ठलभक्तीची परंपरा सुरु झाली. सुरु झालेली ही परंपरा वारकरी संप्रदायाकडून अद्याप अखंड सुरु आहे.
आषाढी एकादशी निमित्त निघणारी पंढरीची वारी ही महाराष्ट्राची शान आहे. म्हणूनच एकादशी निमित्ताने आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश Facebook, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्रं!
|| टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा||
||माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ||
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
रूप पाहता लोचनी
सुख जाले ओ साजणी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
बहुता सुकृतांची जोडी
म्हणुनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर
बाप रखुमादेवीवर
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!
पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हिच प्रार्थना पांडुरंगाला
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेछा!
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पहा व्हिडिओ:
आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महिन्याभर आधीच पंढरीची वारी निघते. यात सर्व वारकरी अगदी भक्तीभावाने आणि श्रद्धेने सहभागी होतात. टाळ, मृदंग, तुळस, भगवी पताका घेत नाचत-गात, भजन कीर्तनांनी वारी निनादून जाते.