Bhagwan Gautam Buddha (Photo Credits: Pixabay)

आसलहा पूजा (Asalha Puja)  हा दिवस बौध्द धर्मात अत्यंत पवित्र दिवस मानल्या जातो. आसलहा पूजा ही आषाढ (Ashadh) महिन्यातील पौर्णिमेला साजरी करण्यात येते. या दिवशी भगवान बुध्दांनी (Bhagwan Buddha) सर्वप्रथम आपल्या शिष्यांना पहिला उपदेश दिला होता म्हणून हा दिवस आसलहा पूजा म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रात या आसलहा पूजेलाचं आषाढी पौर्णिमा म्हणतात.   आसलहा पूजा थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येत असली तरी भारतातील बुध्द धर्मिय देखील हा पवित्र दिवस साजरा करतात. हा सण इंग्रजी महिन्याच्या जुलै महिन्यात येतो. यावर्षी आसलहा पूजा 13 जुलैला असुन थायलंडमध्ये (Thailand) या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते.

 

आसलहा पूजेची सुरुवात अडीच हजार वर्षापूर्वी झाली अशी आख्यायिका आहे. किंबहूना ज्या वर्षिपासून आसलहा पूजेची सुरुवात झाली ते वर्ष बौध्द समाजासाठी आणि भगवान बुध्दांसाठी अत्यंत महत्वाचं वर्ष समजलं जातं. कारण याच वर्षी भगवान बुध्दाचा पुत्र राहूलचा (Rahul) जन्म झाला आणि भगवान बुध्दांनी सगळं भौतिक सुख सोडत भिक्षुकी जिवनाचा स्वीकार केला. राहूलचा जन्म आणि भगवान बुध्दांचं संसारीक सुख त्यागत भिक्षुकी मार्ग स्वीकारणं या दोन्ही गोष्टी आसलहा महिन्यातचं घडल्या म्हणून आसलहा महिन्याल्या आणि या महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच आसलहा पूजेला बौध्द धर्मात विशेष महत्व आहे. (हे ही वाचा:-Guru Purnima 2022 Date and Time in India: गुरुपौर्णिमेची तिथी, प्रथा आणि महत्त्व, जाणून घ्या)

 

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुध्दांनी सर्वप्रथम त्यांच्या पाच शिष्यांना बनारस मध्ये उपदेश दिला होता. तसेच याचं दिवशी बुध्दांनी कोंडन्नाला त्यांचा पहिला शिष्य म्हणून निवडल होतं. जो बौध्द धर्माचा पहिला भिक्षुकी आहे. आसलहा पूजा खास पध्दतीने साजरी केली जाते. ज्यात बुध्दांनी दिलेल्या उपदेशांचं पठन करणं, मेणबत्या लावत रोषणाई करणं, भिक्षुक्यांना प्रसादाचं वाटप करत आसलहा पूजा साजरी केली जाते. भारतात आसलहा पूजेला धम्मदिन असेही म्हणतात.