Anganewadi Bharadi Devi Jatra Prasad: कोकणामध्ये सिंधुदुर्ग मालवण (Malvan) जिल्ह्यात दरवर्षी आंगणेवाडी (Anganewadi) यात्रेचे आयोजन केलं जातं. यंदा 25 फेब्रुवारी 2019 दिवशी आंगणेवाडीच्या जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेची तारीख ठरवण्यापासून त्यामधील विधी आणि रिती रिवाज यांचे खास वैशिष्ट्य आहे. राजकाराणांपासून, कलाकार ते अगदी सामान्य चाकरमाणी आंगणेवाडीच्या यात्रेसाठी हमखास कोकणात हजेरी लावतात. देवीच्या दीड दिवसाच्या उत्सवामध्ये सारे एकरूप होऊन सहभागी होतात. देवीच्या तजेलदार मूर्तीपासून तिच्या प्रसादाबद्दल अनेक गोष्टी खास असतात. भराडी देवीच्या प्रसादाला 'ताटं लावणं' म्हणतात. पण आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या (Anganewadi Bharadi Devi Jatra) प्रसादाबद्दल खास गोष्ट तुम्हांला ठाऊक आहे का?
आंगणेवाडीच्या भराडी देवीचा प्रसाद का खास असतो?
भराडीदेवीचा प्रसाद हा आंगणेगावातील माहेरवाशी एकत्र जमून बनवतात. हा प्रसाद बनवताना त्यांना बोलण्याची परवानगी नसते. प्रसादामध्ये भोपळ्याचे वडे, भाजी, भात, वरण याचा समावेश असतो. हा प्रसाद केळीच्या पानावर मांडला जातो. हा प्रसाद देवीला दाखवण्याच्या प्रक्रियेला ' ताट लावणं' असं म्हटलं जातं. Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी 2019 यात्रेसाठी मध्य रेल्वे चालवणार आज रात्री विशेष अनारक्षित गाडी, पहा वेळ आणि कुठल्या स्थानकांवर थांबणार
कसा दिला जातो प्रसाद
देवीच्या नैवद्याचं ताट हिरव्या साडीमध्ये गुंडाळून त्याचं गाठोडं बनवलं जातं. त्याची पूजा केली जाते. हे गाठोडं पूजेनंतर डोक्यावर घेऊन मुली मंदिरात जातात. त्यांना वाट दाखवण्यासाथी पेटती मशाल घेऊन गावकरी त्यांच्या मागे जातात. देवीच्या मंदिरात गाठोडं उघडून गार्हाणं म्हटलं जातं. काही प्रसाद आंगणेवाडीच्या घरात दिला जातो. हा प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी असते कारण या प्रसादाला देवी स्पर्श करते अशी भाविकांची धारणा आहे. प्रसाद मिळाला तरतो पूर्ण खाल्ला जायला पाहिजे असा नियम आहे. तो घरी घेऊन जाता येत नाही. तांदळाच्या वड्याने देवी आली होती अशी गावकर्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवी गावाबाहेर जाऊ नये म्हणून प्रसादही बाहेर घेऊन जाण्यास परवानगी नसते.
दीड दिवसांच्या भराडी देवीच्या यात्रेमध्ये देवीच्या उत्सवासोबतच दशावतारीचा खेळ देखील रंगतो. भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी खास बंदोबस्त असतो.