Anganewadi Bharadi Devi Jatra 2019 Central Railway Special Train: कोकणातील श्रद्धास्थान असलेलं आंगणेवाडी जत्रेसाठी (Anganewadi Bharadi Devi Jatra)आज मध्य रेल्वेने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्निमल्स ते मडगाव या स्थानकादरम्यान ही विशेष गाडी धावणार आहे. 01193 ही गाडी 22 फेब्रुवारीच्या रात्री 8.55 वाजता CSMT स्थानकावरून वरून सुटणार आहे. ही गाडी अनारक्षित असल्याने कोकणात भराडीदेवीच्या आंगणेवाडी जत्रेसाठी जाणार्या अनेक भाविकांना फायदा होणार आहे.भराडीदेवीची यात्रा (Anganewadi Bharadi Devi ) 25 फेब्रुवारी 2019 दिवशी होणार आहे. Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी 2019 यात्रेसाठी मुंबई, पुणे येथील भाविकांसाठी मध्य रेल्वे चालवणार 10 विशेष ट्रेन्स, 16 फेब्रुवारीपासून बुकिंग होणार सुरू
पहा आंगणेवाडी जत्रा 2019 विशेष गाडीचं वेळापत्रक
आंगणेवाडी यात्रेकरिता मध्य रेल्वे तर्फे विशेष गाडी क्र. ०११९३ CSMT येथून शुक्र. दि.२२.२.२०१९ रोजी रात्रौ ८.५५ वा. प्र. मडगाव दुस-या दिवशी दुपारी १२.३० वा. आ. तसेच विशेष गाडी क्र. ०११९४ रविवार दि.२४.१२.२०१९ रोजी मडगाव प्र.१०.४० वा. CSMT मुंबई अा. त्याच दिवशी रात्री ११.४५ वा. pic.twitter.com/4cb0ZN1gGr
— Central Railway (@Central_Railway) February 22, 2019
कोणत्या स्थानकावर थांबणार ट्रेन्स
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी स्थानकावर ट्रेन्स थांबणार आहे. या गाडीमध्ये 7 जनरल सेकंड क्लास आणि 4 जनरल सेकंड सीटिंग डब्बे असतील.
आंगणेवाडी यात्रेकरिता मध्य रेल्वेतर्फे विशेष गाडी क्र. 01193 CSMT येथून शुक्रवारी रात्री 8.55 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुस-या दिवशी दुपारी 12.30 वाजता पोहचेल. तसेच विशेष गाडी क्र.01194 रविवारी 24 फेब्रुवारी दिवशी मडगाव येथून 10.40 वाजता सुटेल आणि CSMT मुंबईला रात्री 11.45 वाजता पोहचणार आहे.