Anant Chaturdashi 2024 Wishes In Marathi: अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) च्या दिवशी 10 दिवशीय गणपती बाप्पाचे विसर्जन (Ganpati Visarjan) केले जाते. दरवर्षी भाद्रशुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. यावर्षी अनंत चतुर्दशी मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाचीही सांगता होते. गणेशोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3.11 नंतर अनंत चतुर्दशी तिथी सुरू होईल. चतुर्दशी तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:45 वाजता समाप्त होईल.
शास्त्रानुसार कोणतीही तिथी पाळताना तिचा उदय काल (सकाळची वेळ) ही तिथी मानली जाते. अशा प्रकारे चतुर्दशीच्या मान्यतेनुसार 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाईल. या दिवशी गणेशजींचे विसर्जनही होणार आहे. अनंत चतुर्दशी निमित्त तुम्ही WhatsApp Status, Quotes, Slogans द्वारा शुभेच्छा देत लाडक्या गणरायाला निरोप देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील अनंत चतुर्दशी शुभेच्छा-संदेश डाऊनलोड करू शकता.
निरोप देतांना गणराया दुख होते आम्हा,
पण पुढच्या वर्षी लवकर यावास म्हणून,
तुझ्या घरी पाठवतो तुला.
चिमुकल्यांच्या डोळ्यात असते पाणी
पण इथल्या गोष्टी तुला तुझ्या आईवडलांना सांगायच्याय,
अशी समजूत घालून देतो, आणि गातो गाणी.
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा.
आली अनंत चतुर्दशी मनात हुरहूर !
देव बाप्पा आपल्या गावी जातोय दाटले दुःख सर्वदूर !
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पा तुझा हात सदैव
आमच्या माथी असू दे,
तुझी साथ जन्मोजन्मी
पाठीशी असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात यश मिळू दे..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या..!
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलाच्या तालात
गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत
याहो पुढल्या वर्षाला…
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
रिकामं झालं घर, रिता झाला मखर
पुढल्या वर्षी लवकर येण्यास
निघाला लंबोदर
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!
17 सप्टेंबर रोजी सकाळी 10.43 ते 12.15 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. या कालावधीत तुम्ही कधीही विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करू शकता. विशेषत: महाराष्ट्रात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. गणेशभक्त मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाला निरोप देतात.