Akshaya Tritiya 2020 | File Image

Akshaya Tritiya 2020 Marathi Messages: हिंदू धर्मात सण उत्सवांची रेलचेल असते. एका मागून एक येणारे सण जीवनात नवा बोध आणतात. असाच एक शुभ सण उद्यावर येऊन ठेपलाय. उद्या 26 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होणार आहे. साडेतीन मुहर्तांपैकी एक मुहर्त या दिवशी असतो. त्यामुळे नव्या वस्तूंची खरेदी, शुभकार्य यासाठी हा दिवस मंगलमय मानला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तसंच या दिवशी आपण जे काही कार्य करु ते अक्षय होते असे मानले जाते. म्हणून या दिवशी पवित्र कामं करण्यावर भर दिला जातो. अक्षय्य तृतीयेला दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी स्वइच्छेने केलेले कोणतेही दान फलदायी ठरते असे मानले जाते. तर अक्षय्य तृतीयेचा सण आपल्याला चांगले वागणे, बोलणे, दान करणे हा गोष्टी शिकवतो. यंदा कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे दानधर्म किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडता येणार नाही. मात्र या दोन्ही गोष्टी आपण ऑनलाईन माध्यमातून करु शकतो. तसंच अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देखील आपण सोशल मीडिया माध्यमातून देऊ शकतो. (Akshaya Tritiya 2020 निमित्त ऑनलाईन सोने खरेदी करण्यासाठी '5' पर्याय!)

अक्षय्य तृतीया या शुभ दिनाच्या शुभेच्छा आपल्या प्रियजननांना, मित्रमंडळी, नातेवाईकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images, शुभेच्छापत्रं... (अक्षय्य तृतीया च्या खास मराठमोळ्या शुभेच्छा, Messages,Greetings, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन करा दिवसाची मंगलमयी सुरुवात)

अक्षय तृतीया शुभेच्छा!

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी तुमच्या जीवनात येवो नवचैतन्य,

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Akshaya Tritiya 2020 Messages (2)
Akshaya Tritiya 2020 | File Image

अक्षय्य तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा!

Akshaya Tritiya 2020 Messages (5)
Akshaya Tritiya 2020 | File Image

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,

तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,

अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

Akshaya Tritiya 2020 Messages (4)
Akshaya Tritiya 2020 | File Image

सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय्य तृतीया,

तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Akshaya Tritiya 2020 Messages (3)
Akshaya Tritiya 2020 | File Image

धन लक्ष्मी येवो घरा,

वैभव मिळो अपार,

आनंदाच्या दीपांनी प्रकाशित होवो घर-संसार

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!

Akshaya Tritiya 2020 Messages (1)
Akshaya Tritiya 2020 | File Image

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा:

सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Akshaya Tritiya टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.

महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. तर उत्तर भारतातील लोक या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेतीच्या कामास प्रारंभ करतात. देशावर या सणास 'आखेती' असे म्हणतात.