Akshaya Tritiya 2020 Marathi Wishes: साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य या दिवसाचा अर्थ कधीही क्षय न पावणारे म्हणजेच नाश न पावणारे. म्हणूनच या दिवशी दानाचं विशेष महत्त्व असतं. या दिवशी दिलेले कोणतचं दान क्षयाला जात नाही अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी सोन्याची देखील खरेदी केली जात आहे. तर काही लोक नवीन वस्तू, घरं किंवा नव्या उद्योगाला देखील सुरुवात करतात. या दिवशी विष्णूचा (Lord Vishnu)अवतार असलेल्या परशुरामाचादेखील (Parshuram) जन्म झाला असल्याने अक्षय्य तृतीयेसोबत परशुराम जयंती साजरी केली जाते. अनेकजण या दिवशी शुभ कार्याची सुरूवात करतात. अशा शुभ दिनी गरज असते ती मराठमोळ्या शुभेच्छा ग्रिटिंग्सची
अशा या शुभ दिनाची सुरुवात मंगलमयी पद्धतीने व्हावी आणि आनंदात हा उत्सव साजरा केला जावा यासाठी तुमच्या नातलगांना, मित्र परिवाराला मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश:
अक्षय्य तृतीयाचा आला शुभ दिन
देवी लक्ष्मीच्या चरणी व्हा लीन
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
अक्षय्य तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आशा आहे या मंगल दिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारा प्रत्येक दिवस आपल्या जीवनात
सुख-समृद्धी घेऊन येवो
अक्षय्य तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा
अक्षय राहो सुख तुमचे
अक्षय राहो धन तुमचे
अक्षय राहो प्रेम तुमचे
अक्षय राहो आरोग्य तुमचे
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
हेदेखील वाचा- Akshaya Tritiya 2020: यंदा 26 एप्रिल रोजी साजरी करा अक्षय्य तृतीया; जाणून घ्या या सणाचे महत्त्व
तुमच्या घरात धनाची बरसात होवो
लक्ष्मीचा सदैव वास राहो
संकटांचा नाश होवो
शांती चा वास राहो
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा
या दिवशी केलेल्या जप, होम, दान इत्यादी गोष्टी अक्षय फल देणाऱ्या होतात. म्हणूनच या दिवशी चांगले विचार करावेत, चांगले काम करावे, चांगले बोलावे म्हणजे तेही अक्षय होऊन जाते. अशा या मंगलमयी दिनाच्या लेटेस्टली मराठी कडून हार्दिक शुभेच्छा!