Yoga Day 2019 Theme: येत्या 21 जूनला संपूर्ण जगभर 'जागतिक योग दिवस' (International Yoga Day) साजरा केला जाईल. त्याचे औचित्य साधून सर्व दिग्गज मंडळी अगदी कलाकारांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वजण योगा (Yoga) चा प्रचार करत आहेत. यंदाची योगा डेची थीम Yoga For Heart असल्यामुळे हृदयासाठी योगाची कोणती आसने चांगली आहेत हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रदूषणामुळे लोकांना हृदयाशी निगडित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे हे आजार होऊ नये किंवा ज्यांना हृदयाशी संबंधित काही आजार झाले असतील त्यांनी कोणती आसने करावीत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम
1. सेतू बंधासन (Setu Bandhansana):
सेतू बंधासनामुळे तुमच्या पाठीच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच या आसनामुळे आपली पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर हृदयाची कार्यक्षमताही वाढवते.
2. त्रिकोणासन (Trikonasana):
हे उभे राहून छाती फुलवणारे आसन आहे, ज्यात हृदय व रक्तवाहिन्यांना व्यायाम मिळतो. खोल श्वास घेताना छाती फुलवली गेल्यामुळे तग धरण्याची क्षमता वाढते. तसेच या आसनाने तुमच्या कमरेच्या मांसपेशींना मजबूत बनवतो.
3. चक्रासन(Chakrasana):
हे आसन मणक्याचे हाड मजबूत बनवतो. हे आसन श्वासोच्छवास सुरळीत करतो. तसेच हे आसन करताना हृदयावर थोडा जोर पडत असल्याने तुमच्या हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
4. पादहस्तासन (Padhastasana):
या आसनाने तुमचे मणक्याचे हाड लवचिक बनवते. महिलांच्या मासिक पाळी वेळी होणारा त्रास कमी करतो.
5. शलभासन (Shalabhasana):
हे स्पोंडिलोसिस या कंबरेच्या आजरांपासून सुटका देण्यासाठी ओळखले जाते. या आसनात अंतिम स्थितीत शरीराचा आकार हा जमिनीवर बसलेल्या टोळाप्रमाणे (शलभ) वाटतो. वर उचललेले पाय टोळाच्या शेपटीच्या भागाप्रमाणे वाटतात. म्हणून या आसनास ‘शलभासन’ असे म्हणतात. महिलांनी या आसनाचा नित्य सराव केल्यास मासिक पाळीच्या वेदनांचा त्रास कमी होतो.
योग हे मनाचे शास्त्र आहे. त्यामुळे योगसाधनेचा परिणाम केवळ शरीरावर न होता मनावर आणि भावनांवरही होतो. त्यामुळे तुम्हाला सध्याच्या फास्ट लाईफ मध्ये निरोगी राहायचे असेल तर थोडासा वेळ काढून ही आसने जरुर करा.