PM Narendra Modi Yoga Video (Photo Credits: Twitter)

आंतरराष्ट्रीय योग दिना (International Yoga Day 2019)  निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या ऑनलाईन योग व्हिडिओ सिरीज मध्ये आज शलभासन (Shalbhasana)  आसनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये मोदींनी शलभासनाचे महत्त्व , फायदे आणि आसनाची कृती सांगितली आहे. 5 जून पासून सुरु केलेल्या या सिरीजमधील हे तेरावे आसन आहे.

शलभासन हे स्पोंडिलोसिस या कंबरेच्या आजरांपासून सुटका देण्यासाठी ओळखले जाते. या आसनात अंतिम स्थितीत शरीराचा आकार हा जमिनीवर बसलेल्या टोळाप्रमाणे (शलभ) वाटतो. वर उचललेले पाय टोळाच्या शेपटीच्या भागाप्रमाणे वाटतात. म्हणून या आसनास ‘शलभासन’ असे म्हणतात. महिलांनी या आसनाचा नित्य सराव केल्यास मासिक पाळीच्या वेदनांचा त्रास कमी होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगासनं करतानाचे अॅनिमेडेट व्हिडिओज सोशल मीडियावर हिट; Yoga Day ची जय्यत तयारी

नरेंद्र मोदी शलभासन व्हिडीओ

2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेतील आपल्या भाषणात मोदींनी दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत 21 जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून 21 जून हा दिवस 'योगदिन' म्हणून साजरा केला जातो. मात्र अद्यापही अनेक नागरिक या आरोग्यवर्धक सवयींकडे दुर्लक्ष करताना पाह्यला मिळतात, या मंडळींना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी मोदींनी यंदा हा ऑनलाईन उपक्रम सुरु केला आहे.