International Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम
yoga Pic (Photo Credits: PixaBay)

International Yoga Day 2019: प्राचीन काळात ऋषि-मुनी परमेश्वराला स्वत:ला जोडण्यासाठी योगाचा अभ्यास करायचे असं सांगितले जायचे. मात्र हेही तितकेच खरे आहे की योगा (Yoga) ने न केवळ व्यक्ति आध्यात्म रुपाने जोडला जातो तर निरोगी शरीर सुद्धा प्राप्त करतो. असे सांगितले जाते की योगा केल्याने तुम्हाला असलेले रोग अथवा आजार दूर पळून जातात. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला योगा आणि ध्यान करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

योगाने आपले शरीर निरोगी आणि सशक्त बनते. याच योगाचे महत्त्व सा-या दुनियेला कळावे म्हणून 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस (International Yoga Day 2019) साजरा केला जाणार आहे. मात्र या योगक्रिया करताना आवश्यक ती सावधानता न बाळगल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम तुमच्या शरीराला भोगावे लागतील. चला तर मग माहित करुन घेऊया त्या 10 गोष्टी ज्या योगा करताना विचारात घेतल्या नाहीत, तर तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होईल.

1. योगा करतेवेळी पाणी पिऊ नये

जर तुम्ही योगा करत असाल तर त्या दरम्यान अजिबात पाणी पिऊ नका. कारण योगामुळे शरीरामध्ये हिट निर्माण होते. त्यात जर तुम्ही पाणी प्यायलात तर तुम्हाला एलर्जी, सदी-खोकला आणि कफ होऊ शकतो.

2. योगा केल्यानंतर त्वरित स्नान करु नये

सकाळच्या वेळी योगा करणे खूपच फायद्याचे मानले जाते. मात्र योगा केल्यानंतर त्वरित आंघोळ न करता एक तासानंतर आंघोळ करावी.

3. खाल्यानंतर त्वरित योगा करु नये

काही खाल्ल्यानंतर योगा करु नये. खाल्यानंतर तुम्ही केवळ वज्रासन करु शकता. इतर योगक्रिया करण्यासाठी खाण्यानंतर कमीत कमी 3 तासाचे अंतर असावे.

4. आजारी असाल तर योगा करू नये

आजारपाणात तुम्ही योगक्रिया करु नका कारण त्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. जर तुम्ही आजारपणातही योग करु इच्छिता तर डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला द्या.

5. स्वच्छ ठिकाणी योगा करणे

योगा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटक्या ठिकाणी केला पाहिजे. कारण ताज्या आणि मोकळ्या हवेत योगा करणे फायद्याचे समजले जाते.

6. चुकीची आसने करण्यापासून सावध रहा

योग्य योगा करण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. चुकीची आसने केल्याने शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्याने तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्या अद्भवू शकतात.

7. शारीरिक समस्या असलेल्या योग करु नका

जर तुम्हाला पाठदुखी, गुडघेदुखी किंवा मांसपेशी शी संबंधित तक्रारी असतील तर तुम्ही योगा करु नका. तसेच तुमच्या योगा प्रशिक्षकाचा योग्य तो सल्ला घेऊन सुयोग्य असा योग प्रकार करा.

8. आरामदायी कपड्यांमध्ये योगा करा

योग करताना खूप घट्ट कपडे वापरु नये. योग करताना मुख्यत्वे हवामानानुसार, कपडे वापरा. शक्यतो सैलसर कपडे वापरलेले कधीही चांगले. तसेच योगा करताना जमिनीवर काहीतरी अंथरुणचं योगा करा.

9. योग करतेवेळी बाथरुमला जाऊ नका

योगा करतेवेळी सतत बाथरुमला गेल्याने शरीरातील पाणी कमी होते. योगा करताना घाम येणे खूप फायद्याचे मानले जाते. त्यामुळे योग करताना सतत बाथरुमला जाणे शक्यतो टाळा

10. सुरुवातीला कठीण योगा करु नका

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर सुरुवातीला थोड्या सोप्या पद्धतीने योगा करुन सुरुवात करावी. सुरुवातीलाच अवघड योगा केल्यास शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा- International Yoga Day 2019: हृदयासाठी खूपच फायदेशीर आहेत ही 5 योगासने, नक्की करुन पाहा (Watch Video)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग करण्यासाठी आधी शरीराची सकारात्मक भूमिका असली पाहिजे. त्यासाठी योग करण्याआधी थोडा वॉर्मअप करा, प्राणायाम करा आणि त्यानंतर योगाला सुरुवात करा आणि शेवटी शवासन करा.