काय तुमची मुले खोटे बोलतात? मग पालकांनी टाळा 'या' गोष्टी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

(Good Habit For Children) आपण लहान मुलांना (child) नेहमी खरे बोलावे असे सांगत असतो. आपल्याला हवे तेव्हा आपण मुलांशी खोटे बोलतो. अगदी साधी गोष्ट, जेव्हा मुले एखादी गोष्ट आणि त्यामागची कारणे विचारतात तेव्हा आपण आपल्या सोयीने हवे ते सांगत बसतो. लहान मुले मोठ्यांची वागणूक पाहूनच शिकत असतात. परंतु लहान मुलांना योग्य वेळी चांगली वागणूक नाही मिळाली तर, त्यांचे नुकसान होऊ शकते. यासाठी पालकांनी (Parents) कशा पद्धतीने मुलांशी वागले पाहिजे? आपल्या कोणत्या चुकीमुळे लहान मुले खोटे बोलायला शिकतात? तसेच मोठ्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पालकांनी या गोष्टींकडे लक्ष द्या

मुले आपले वागणे बोलणे हे मोठ्यांकडूनच शिकत असतात. आपले वागणे आणि इतरांशी बोलणे हेच त्यांच्यासाठी एक प्रमाण असते. त्यामुळे आपल्या वागण्याकडे आपले लक्ष असणे खूप महत्वाचे आहे. एकतर घरात अगदी कडक वातावरण असते. ज्यामुळे मुले आपल्या चुका मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. मुलांशी मोकळेपणाने वागायला शिका. मुलांकडून जेव्हा एखादी चूक घडते, तेव्हा मुले घाबरतात. आपली चूक माफ होऊ शकत नाही. तसेच त्या चुकीसाठी त्यांना मोठी शिक्षा मिळू शकते, असा गैरसमज लहान मुलांच्या मनात येऊ लागतो. तेव्हा मुले चूक लपवायला आणि खोटे बोलायला शिकतात.

मोठ्यांकडून चूक झाली तर त्यांना शिक्षा नसते. परंतु आपल्याकडून छोटी चूक झाली तरी मार बसतो, असे पाहून त्यांच्या मनात भेदभाव निर्माण होतो. त्यानंतर त्यांना मोठ्यांचा राग येऊ लागतो. आपण खरे सांगितले तरीदेखील आपल्याला मार पडतो. त्यापेक्षा आपण काही गोष्टी लपवून ठेवावे, असे त्यांना वाटू लागते. त्यानंतर त्यांना खोटे बोलण्याची सवय लागते. हे देखील वाचा-अरेंज मॅरेजची भीती? ठरवून होणाऱ्या लग्नासाठी होकार देण्याआधी या 5 गोष्टींचा विचार नक्की करा

यापैकी काहीही घरात घडत असेल तर ते तात्काळ थांबवणे तुमचे काम आहे. खरे बोलले तरी चालेल मी तुला मारणार नाही, हे वाक्य त्यांना खरे बोलायला मदत करणारे ठरते. मारणे हा काही मुलांना सुधारण्याचा पर्याय नाही याउलट त्याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो, हे पालकांनी समजून घ्यायला हवे.