राशीभविष्य 20 ऑगस्ट 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस
राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

20 ऑगस्ट  2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष: मेष राशीतील व्यक्तींनी आज संभाळून काम करा. अतिघाई संकटात नेई अशी स्थिती स्वत:वर ओढवून घेऊ नका. आई-वडिलांचा मान राखा. नोकरीच्या बाबतीत उत्तम दिवस असेल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल

शुभ उपाय- अर्धा कप दुध प्या.

शुभ दान- राईचे तेल दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पांढरा

वृषभ: या राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल.प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. मात्र भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

शुभ उपाय- गाईला खिचडीचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरीब आजारी व्यक्तींना फळ दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

कर्क: या राशीतील मंडळींनी आज कायद्यासंदर्भातील गोष्टींपासून दूर रहावे. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वाहन सावधगिरीने चालवा. तर कोणताही निर्णय जलदपणे घेऊ नका.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळाचे सेवन करा.

शुभ दान- वृद्धाश्रमातील व्यक्तींना वस्रदान करा.

शुभ अंक-3

शुभ रंग- पिवळा

सिंह: सिंह राशीतील व्यक्तींच्या दिवसाची सुरुवात धनलाभापासून होणार आहे. घरात सुख शांती नांदणार आहे. विचारपूर्वक कामे केल्यास होणाऱ्या नुकसानीपासून दूर रहाल. आई-वडिलांची कोणतीही गोष्ट टाळू नका.

शुभ उपाय- केशरयुक्त दुधाचा नैवद्य दाखवा.

शुभ दान- मोहरीच्या तेलाचे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- निळा

कन्या: या राशीतील व्यक्तींनी आज वाहन सावधपणे चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. घरातून निघण्यापूर्वी आई-वडिलांचा आशिर्वाद घ्या. मित्रपरिवारासह नव्या गोष्टी शिकण्यास तयार रहा. प्रिय व्यक्तीकडून तुमचे आज कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर जा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- हिरवा

तुळ: तुम्ही आज एका वेगळ्याच अंदाजात काम पूर्ण कराल. प्रकृती थोडी बिघडेल परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रिय व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- हिरव्या भाज्यांचे सूप प्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- क्रिम कलर

वृश्चिक: आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून छानसे गिफ्ट भेटेल. आई-वडिलांकडून लग्नासंबधित गोड बातमी कळेल.

शुभ उपाय- दुरवांची जुडी बनवून गणपती मंदिरात ठेवा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- हिरवा

धनु: उद्योगधंद्यातील मंडळींना कामात आजच्या दिवशी लाभ होणार आहे. दुसऱ्या मंडळींकडून तुमच्या कामाचे कौतूक केले जाईल त्याचसोबत इतर लोक तुमचा आदर करतील. थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- कापूर टाकून देवाची पूजा करा.

शुभ दान- अत्तर दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पोपटी

मकर: या राशीमधील व्यक्तींना आज विदेशातून शुभ संकेत मिळतील. तसेच मित्रपरिवारासह आज तुम्हाला दिवस घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहिल परंतु पूर्ण काम करण्यासाठी आळशीपणा कराल. घरातील मंडळींची साथ लाभेल.

शुभ उपाय- गुळ घाऊन घरातून निघा.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.

शुभ अंक- 5

शुभ रंग- निळा

कुंभ: कुंभ राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस हा खास असणार आहे. कारण आजच्या दिवसात तुमच्याकडून एका वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने कामे पूर्ण होणार असून आत्मविश्वास वाढणार आहे. मित्रपरिवारासह बाहेर जाण्याचा योग आहे. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- खडीसाखरेचे सेवन करावे.

शुभ दान- गरजूंना तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पिवळा

मीन: मीन राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. देवाचे नामस्मरण करा दिवस उत्तम जाईल. तुमची प्रियकर व्यक्ती तुम्हाला फोन करुन सतावण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईंना चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- केशरी