COVID-19 MythBusters: काळीमिरीचा वापर करुन कोरोनावर उपचार करता येतो? जाणून घ्या विशेषज्ञांचे मत
Black Paper (Photo Credits-Facebook)

COVID-19 MythBusters: कोरोना व्हायरस पासून बचाव करायचा असल्यास काळीमिरीचे सेवन करावे असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातील फेसबुक ते व्हॉट्सअॅपवर तुफान व्हायरल केला जात आहे. यामध्ये असे ही म्हटले की, या गोष्टीची पुष्टी पाँडेचेरीतील मेडिकल मधील एका विद्यार्थ्याने शोध लावला असून डब्लूएचओ यांनी सुद्धा त्याला मंजूरी दिली आहे. परंतु खरंच या व्हायरल झालेल्या मेसेजवर विश्वास ठेवावा? पण दुसऱ्या बाजूला डब्लूएचओ कडूनच आतापर्यंत कोरोना व्हायरस वरील कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर जाणून घ्या व्हायरल झालेल्या मेसेज बद्दल लोक काय बोलतायात.(Disease X: कोरोना व्हायरसनंतर जगाला आता 'डिसीज एक्स' विषाणूचा धोका; इबोलाचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाचा इशारा)

भारतीय दृष्टीकोनातून काळीमिरीच्या वापराचा उपयोग यामागील सत्य नाकारु शकत नाही. कारण काळीमिरीचा वापर देशात शेकडो वर्षापासून विविध आजारांवर केला जात आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये आज सुद्धा काळीमिरी पासून तयार केलेल्या औषधांचा वापर केला जातो. विशेषज्ञांचे असे म्हणणे आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा काळीमिरीचा वापर औषधाच्या रुपातच केला जात होता. त्यावेळी काळीमिरीची किंमत ही सोन्याऐवढी होती. पण मसाल्याच्या रुपात याचा वापर खुप वर्षानंतर सुरु झाला.

तर पाँडेचेरी युनिव्हर्सिटीचा रामू नावाच्या एका भारतीय विद्यार्थ्याने कोविड19 वर घरगुती उपचार शोधून काढला आहे. ज्याला डब्लूएचओ कडून प्रथमच परवानगी दिली गेली आहे. त्याने असे म्हटले की, काळीमिरीच्या पावडरचा एक लहान चमचा, दोन चमचे मध, थोडा आल्याच्या रसाची पेस्ट करुन नियमीत 5 दिवस घेतल्यास कोरोनाचा प्रभाव शंभर टक्के संपवला जाऊ शकतो.संपूर्ण जग याचा वापर केला जात असल्याचा दावा ही व्हायरल झालेल्या मेसेज मध्ये करण्यात आला आहे. यावर पाँडेचेरी युनिव्हर्सिटीचे कुलगुरुंच्या सुत्रानुसार, या संदर्भात कोरोना व्हायरस आणि काळीमिरी बद्दल व्हायरल होणाऱ्या गोष्टी पूर्णपणे खोट्या असल्याचे म्हटले आहे. याचा युनिव्हर्सिटी सोबत काही संबंध नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हा मेसेज कोण आणि का पाठवत आहे ते सुद्धा माहिती नाही. याचा युनिव्हर्सिटीशी कोणताही संबंध नाही.(Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव)

या गोष्टीबद्दल डब्लूएचओच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ही एक दिशाभूल करणारी बातमी आहे. या पद्धतीच्या बातम्यांपासून दूर राहण्यासाठी एक वेगळे सेक्शन तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून कोरोना संदर्भातील सर्व माहितीचे अपडेट्स दिले जातात. ऐवढेच नाही तर आम्ही खोट्या बातम्यांवर तातडीने कारवाई करतो. तसेच कोरोना व्हायरसवर अद्याप ठोस औषध आलेले नाही. तसेच काळीमिरी खाऊन कोरोनावर मात केली जाऊ शकते असे डब्लूएचओ यांनी म्हटले आहे. काळीमिरी ही फक्त जेवाणाचे स्वाद वाढवतो. पण कोरोनाच्या रुग्णाला याचा फायदा होत नाही. तर डब्लूएचओ यांचे असे मानणे आहे की, काही पश्चिमात्य देशात पारंपरिक आणि घरगुती उपचार हे काही प्रमाणात दिलासा देऊ शकतात. पण कोरोनावर पूर्णपणे उपचार केला जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, मास्क घालून घराबाहेर पडणे, संतुलित आहा, गरम पाण्याचे सेवन, हाथ सॅनिटायझरने धुणे हेच उपाय असून तु्हाला ते सुरक्षित ठेवू शकतात.