Weather Forecast For 30 August: भारतीय हवामान विभाग (IMD) ने 30 ऑगस्टचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. आयएमडीने शुक्रवारी तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी पावसाचा रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ, छत्तीसगड, ओडिशा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, किनारी कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, केरळ आणि माहेमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीतील पावसाळ्याच्या अंदाजावर, आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन म्हणाले की, बंगालच्या उपसागरातून दिल्लीत आर्द्रता आली आहे. दिल्लीत शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. 30 ऑगस्ट रोजी दिल्ली एनसीआरमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडेल. या काळात कमाल तापमान 35 अंश आणि किमान तापमान 23 अंश असू शकते. हे देखील वाचा: Mumbai Raod Rage: कॅबची ऑडीला धडक, दोघांकडून ड्रायव्हरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)
आजचे हवामान कसे असेल?
Rainfall Warning : 30th August 2024
वर्षा की चेतावनी : 30th अगस्त 2024 #rainfallwarning #IMDWeatherUpdate #rainfall #Telangana #Saurashtra #Kutch #odisha #Karnataka #Kerala #Mahe #AndhraPradesh #Chhattisgarh @moesgoi @ndmaindia @airnewsalerts @DDNewslive pic.twitter.com/wtUJVLy5u6
— India Meteorological Department (@Indiametdept) August 28, 2024
30 ऑगस्टचा अंदाज येथे जाणून घ्या
#WATCH | Delhi: On rain weather forecast in different states, IMD scientist Soma Sen says, "This month's second low-pressure formed in the Bay of Bengal is moving westward and is above Gujarat in the form of a deep depression... Because of this, we saw extremely heavy rainfall in… pic.twitter.com/S4W282V0Tw
— ANI (@ANI) August 29, 2024
इतर राज्यात कसे राहील आज हवामान , जाणून घ्या
उत्तर प्रदेश: 30 ऑगस्ट रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी आणि पूर्व उत्तर प्रदेशात सरी पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, 31 ऑगस्ट रोजी पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशात असेच हवामान राहणार आहे.
राजस्थान: राजस्थानमध्ये 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी 2 सप्टेंबरपासून कोटा, उदयपूर आणि भरतपूर विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य प्रदेश: हवामान खात्याने राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये 30 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये सतना, मैहर, पांढुर्णा, छिंदवाडा, दिंडोरी, शहडोल, अनुपपूर, रेवा आणि मौगंज जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचवेळी इंदूर, खरगोन, खंडवा, उज्जैन, धार, रतलाम, देवास आणि राजगडसह १४ जिल्ह्यांमध्ये पावसापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बिहार: बिहारमधील हवामान दमट राहील. हवामान खात्याने पुढील 6 दिवस पाऊस किंवा विजांच्या कडकडाटाबाबत कोणताही इशारा दिलेला नाही. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात किंचित वाढ होईल.
आजच्या हवामानाबद्दल स्कायमेटने काय सांगितले? पुढील २४ तासांत, गुजरातच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ, अंदमान आणि निकोबार बेटांचा काही भाग, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
जम्मू-काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक, लक्षद्वीप, तामिळनाडूचा काही भाग आणि गंगा मैदान, पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, मराठवाडा, पश्चिम राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.