Mumbai Raod Rage: कॅबची ऑडीला धडक, दोघांकडून ड्रायव्हरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)

घाटकोपर परिसरात एका ओला ड्रायव्हरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी एका दामप्त्यावर गुन्हा दाखल केला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Mumbai Raod Rage: कॅबची ऑडीला धडक, दोघांकडून ड्रायव्हरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)
Road Rage Video Mumbai Photo Credit TWITTER

Mumbai Raod Rage: घाटकोपर परिसरात एका ओला ड्रायव्हरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी एका दामप्त्यावर गुन्हा दाखल केला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या मारहाणीत ड्राव्हयरला गंभीर दुखापत झाली आहे. (हेही वाचा- गोरेगाव येथे वेगवान कारने धडक दिल्याने 24 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघांना अटक, एक आरोपी अल्पवयीन)

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील पार्कसाइट परिसरात एका ओला ड्रायव्हरला मारहाण केले. घाटकोपर येथील रहिवासी ऋषभ बिभाष चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी अंतरा यांनी मारहाण केले. पोलिसांनी या दोघांवर घाटकोपर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ड्रायव्हरने चक्रवर्ती यांच्या AUDI Q3 कारला धडक दिली. याधडकेत त्यांच्या कारचे नुकसान झाले. ही घटना कुरेशी घाटकोपरच्या असल्फा भागात गाडी चालवत असताना घडली.

या घटनेनंतर संतापलेल्या जोडप्यांनी ड्रायव्हरशी वाद घालण्यास सुरुवात केली. कारमधून बाहेर पडून ड्रायव्हरला मारहाण केली. ऋषभ यांनी ड्रायव्हरला उचलून जमिनीवर फेकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना गुरुवारी तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीनंतर दोघे जण घटनास्थळावरून फरार झाले.

ओला ड्रायव्हरला मारहाण

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या दोघांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला. चक्रवर्तीला शुक्रवारी पोलिस ठाण्यात बोलावले असून तेथे तपास अधिकारी त्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवतील.A

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2024 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).