Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; PM नरेंद्र मोदींकडून मतदान करणाचं आवाहन
(File Image)

Lok Sabha Elections 2024: 18 व्या लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात एकूण 13 राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहाने पार पडला.  दुसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे जनतेचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. (हेही वाचा- कॉंग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई जागेसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर)

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी मणिपूरातील चार उमेदरवारांसह 1206 उमेदवार निवडणूक लढवत आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारींपैकी राहुल गांधी, हेमा मालिनी, तेजस्वी सुर्या, केंद्रीय मंत्री राजीव शेखर यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या टप्प्यांतील मतदाराला मतदान करण्याचे आवाहान केले आहे.

पहा ट्वीट

19 एप्रिल रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली होती. 102 जागांवर मतदार करण्यात आलं होते. त्यावेळी 65.5 टक्के मतदानाची नोंद झाली होती. महाराष्ट्रात आज 8 मतदारसंघावर मतदान होणार आहे.