Loksabha Election 2024: गुरुवारी महाविकास आघाडीने मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीने उत्तर मध्यची जागा काँग्रेसला दिली होती. त्यामुळे काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. पूनम महाजन या मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. मात्र भाजपने अद्याप येथून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. यामागे पक्षांतर्गत वाद असल्याचे मानले जात आहे. मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून भाजप सलग दोन वेळा विजयी होत आहे.
मुंबई नॉर्थ सेंट्रल सीट ही एक व्हीआयपी सीट मानली जाते. 2014 पूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती. दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त 2009 मध्ये याच मतदारसंघातून संसदेत पोहोचल्या होत्या. 2004 मध्येही काँग्रेसने ही जागा जिंकली होती. यापूर्वी अविभाजित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी येथून निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांच्याकडून पराभव झाला होता. (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024: उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या मिरवणुकांवर प्रशासनाची करडी नजर; वाहन, खाद्यपदार्थ, प्रचार साहित्य इ खर्चाची होणार पडताळणी)
पहा एक्स पोस्ट -
Central Election Committee has approved the candidature of Varsha Eknath Gaikwad as Congress candidate to contest the Lok Sabha elections from 29-Mumbai North Central Parliamentary constituency of Maharashtra. pic.twitter.com/f7aKvDpcmR
— ANI (@ANI) April 25, 2024
#WATCH | Congress leaders and supporters congratulate Varsha Eknath Gaikwad after she was nominated as the Congress candidate 29-Mumbai North Central Parliamentary constituency of Maharashtra. pic.twitter.com/B2kIqiPLP5
— ANI (@ANI) April 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)