Video Of Youth Voting 8 Consecutive Times PC TWITTER

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुक 2024 च्या भारतातील सर्व राज्यांमध्ये जोरात सुरु आहे. सोशल मीडियावर मतदानाचे (Voting) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यात विरोधी पक्षाने नुकताच व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एका तरुणाने EVM मशिनवर सलग आठ वेळा भाजप (BJP) उमेदवाराला मतदान केले आहे. तरुणाला असं करणं चागंलचं भोवले आहे. या व्हिडिओ वर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने तक्रार घेतले आहे. (हेही वाचा- राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गोंधळ, गर्दी पाहून भाषण न करताच परतले)

मिळालेल्या माहितीनुसार, राजन सिंह नावाच्या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्वतःचा दोन मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुकेश राजपूत यांना मतदान करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. अनेक नेत्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि यावर कारवाई करण्याची मागणी केली. एआरओ प्रीतित त्रिपाठी यांच्या तक्रारीच्या आधारे नया गाव पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोग या तरुणावर कारवाई करणार असल्याचे समोर येत आहे. कॉंग्रेस पक्षाने हा व्हिडिओ शेअर करत तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली.  मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय दंड संहिता (IPC) च्या अनेक कलमांखाली आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तरुणाला उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अटक केले आहे..