Viral Video: उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी खराब बटाटे विकले जात आहेत. हे रसायन असलेल्या बटाट्यामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. संभळमध्येही असाच बटाटा जप्त करण्यात आला आहे. अन्न अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दुकानातून 65 पोती बटाटे जप्त केले आहेत. हा जुना बटाटा केमिकल टाकून त्यात माती टाकून नवा बनवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बाजारात नवीन बटाट्याचे भाव खूप जास्त आहेत. बटाटा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. फळे लवकर वाढावीत म्हणून त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर बटाट्यातही भेसळ होऊ लागली आहे. बटाट्यात भेसळ होण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही बटाट्यात केमिकल टाकून विकल्याच्या घटना घडल्या आहेत.
रसायनयुक्त बटाटे जप्त
सम्भल में पुराने आलू में केमिकल व मिट्टी मिलाकर नया आलू बनाया जा रहा है। खाद्य अधिकारी ने 65 बोरी आलू बरामद की हैं।
बाजार में नए आलू की कीमत पुराने आलू से डेढ़ गुना अधिक है। pic.twitter.com/heoIFgvSj9
— Madan Mohan Soni (आगरा वासी) (@madanjournalist) November 17, 2024
बलिया शहरात केमिकल टाकून शिजवून नंतर रंग देऊन विक्री करणाऱ्या 21 क्विंटल बटाटे जप्त करण्यात आले. या घटनेनंतर आता लोक बटाटे पाहूनच खरेदी करत आहेत. ट्विटरवर @madanjournalist या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.