Uttar Pradesh Shocker: धक्कादायक! बलिया येथून अपहरण करून आठवडाभर हैद्राबादमध्ये केला 13 वर्षीय मुलीचा बलात्कार, आरोपीला अटक
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील  (Uttar Pradesh) बलिया जिल्ह्यातील एका गावातून एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. त्यानंतर धक्कादायक म्हणजे मुलीचं अपहरण करून तिला हैद्राबाला नेले आणि तिथे आठवडाभर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, 25 नोव्हेंबर रोजी बलिया येथली मणियार पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या परिसरातून मुलीची सुटका करण्यात आली होती. आरोपीला अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबर रोडी स्थानिक बस स्थानकातून 19 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केले. आरोपी हा पीडित मुलीच्या शेजारी राहायचा. मणियार स्टेशन हाऊस ऑफिसर मंतोष सिंग यांनी सांगितले की मुलीचे 18 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून अपहरणांसंदर्भात भारतीय दंड संहितेच्या आयपीसी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुलींने तक्रारात म्हटल्यानुसार, आरोपी तरुणाने तिचं अपहरण केलं त्यानंतर तिला हैद्राबारला नेलं आणि एक आठवडा तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या विधानानंतर, आयपीसीचे कलम 376 (बलात्कार) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदी या प्रकरणात जोडण्यात आल्या. पोलिसांनी आरोपीला अटक करुन तुरुंगात पाठवले आहे.मुलीची सुटकावरून तीला पालकांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.