Buldhana Gang Rape: बुलढाण्यात एका 35 वर्षांच्या महिलेवर आठ जणांनी बलात्कार केला आणि तीच्या जवळील 45 हजार लूटलं असा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्या हादरला आहे. महिला पर्यटनासाठी आली असताना एका स्पॉटवर सेल्फी काढण्यासाठी उभी होती. आठ जणांनी तीला चाकूचा धाक दाखवत तीच्यावर आळीपाळीने येवून अत्याचार केला. तिच्या कडील 45 हजार घेवून आरोपी फरार झाले. पीडीत महिला आणि तीच्या सोबत तीचा मित्र हे दोघेही खडकी या गावात जात असताना धक्कादायक प्रकार घडला.
पीडीत महिला आणि तीचा मित्र दोघेही राजूर परिसरातील मंदिराजवळ सेल्फी काढण्यासाठी उभे होते. दरम्यान आरोपी आठ जणांची टोळी आली. आणि या दोघांना त्रास देवू लागली. दोघांना मारलं. महिलेला दरीभागात नेलं आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी तीच्याकडचे 45 हजार रुपये घेवून फरार झाले.
या घडनेची माहिती बोरखेडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीसांनी या आोरपींवर गुन्हा दाखल करण्यास उशीर केला असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर रात्री उशीरा पर्यंत पोलीस ठाण्यात हे प्रकरण चालू होते. त्यानंतर पोलीसांनी आरोपी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे कृत्य एवढं भयकंर होते त्याच्यामुळे बुलढाण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या मदतीने एका आरोपीला पकडण्या आले आहे. राहूल राठोड असं या तरुणांच नाव आहे.