Nirmala Sitharaman, Flight (फोटो सौजन्य - ANI)

UDAN Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी 2025-26 साठीचा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रासाठी घोषणा केल्या. भारतीय नागरी विमान वाहतूक बाजारपेठेच्या वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्यासाठी, सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात 120 नवीन ठिकाणे, बिहारमधील विमानतळ प्रकल्प आणि हवाई मालवाहतुकीसाठी पायाभूत सुविधांचे अपग्रेडेशन जोडण्यासाठी सुधारित प्रादेशिक हवाई संपर्क योजना 'उडान' (Ude Desh Ka Aam Naagrik) ची घोषणा केली.

प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यास होणार मदत -

उडानच्या यशाने प्रेरित होऊन, पुढील 10 वर्षांत 120 नवीन ठिकाणांशी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आणि 4 कोटी अतिरिक्त प्रवाशांना वाहून नेण्यासाठी एक सुधारित योजना सुरू केली जाईल, असं सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश सेवा न मिळालेल्या आणि कमी सेवा असलेल्या विमानतळांवरून कनेक्टिव्हिटी सुधारून हवाई प्रवास परवडणारा बनवणे हा आहे. (हेही वाचा -Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गाला दिलासा; सर्वसामान्यांसाठी खास आहेत बजेटमधील 'या' 10 घोषणा)

1.5 कोटी मध्यमवर्गीयांना उडान योजनेचा फायदा -

सुधारित योजनेत डोंगराळ, आकांक्षी आणि ईशान्य प्रादेशिक जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड आणि लहान विमानतळांसाठी मदत समाविष्ट करून त्याची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचंही यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मूळ उडान योजनेमुळे आधीच 1.5 कोटी मध्यमवर्गीय लोकांना जलद हवाई प्रवासाची सुविधेचा लाभ घेता आल्याचंही निर्मला सितारमण यांनी सांगितलं. (वाचा - Zero-Income Tax Slab: खुशखबर! 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; Union Budget 2025 मध्ये केंद्र सरकारची मोठी घोषणा)

8 विमानतळांना जोडणारे 619 मार्ग कार्यान्वित -

शुक्रवारी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, उडानने 88 विमानतळांना जोडणारे 619 मार्ग आधीच कार्यान्वित केले आहेत, ज्यामध्ये दोन जल विमानतळ आणि 13 हेलिपोर्टचा समावेश आहे. सुधारित उडान योजनेव्यतिरिक्त, सीतारामन यांनी बिहारमधील नवीन ग्रीनफील्ड विमानतळांच्या योजना जाहीर केल्या.