काँग्रेस नेते शशी थरुर आणि रविशंकर प्रसाद (file photo)

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाद्दल वादग्रस्त विधान केले. त्याला केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शशी थरुर आणि रविशंकर प्रसाद यांच्यात चांगलेच ट्विटरयुद्ध रंगले आहे. ज्याची सोशल मीडियात जोरादर चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदी हे शिवलिंगावरील विंचवाप्रमाणे आहेत. त्याला हातही लावता येत नाही आणि चपलेने मारताही येत नाही, असे विधान थरुर यांनी केले होते. बंगरुळू येथील लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये बोलताना थरुर यांनी हे वक्तव्य केले .

दरम्यान, थरुर यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना शशी थरुर हे एका हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांनी भगवान शिवचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस अध्यक्ष हे स्वत:ला शिवभक्त मानतात त्यांनी थरुर यांच्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपी असा आरोप केल्याने थरुरही चिडले असून त्यांनीही प्रसाद यांना प्रत्युत्तर दिले आहे. या आरोप प्रत्यारोपामुळे दोघांमध्ये ट्विटरवरुन दोघांमध्ये चांगले ट्विटयुद्ध रंगले आहे. (हेही वाचा, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना 'सल्ला देत हल्ला' म्हणाले, 'गांधी कुटुंबाने देशासाठी केलेल्या त्यागाचे भान ठेवा')

प्रसाद यांच्या हत्येतील आरोपी या आरोपाला उत्तर देताना थरुर यांनी दिलेल्या उत्तर ते म्हणतात, 'हे कोणते हत्या प्रकरण आहे? श्रीयूत कायदेमंत्री आपण अशा काही प्रकरणाचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहात का?' असा सवाल विचारला आहे.

दरम्यान, रविशंकर प्रसाद आणि शशी थरुर यांच्यात सुरु असलेल्या ट्विटयुद्धावर युजर्सनाही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. शशी थरुर सध्या आपल्या 'द पैराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकाच्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहेत.