भारतीय रेल्वेने (Indian Railways) रेल्वे तिकिटांचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा काळा बाजार (Black Market) उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे या गैरव्यवहाराचे धागेदोरे परदेशात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 26 जणांना अटक केली आहे.
रेल्वे तिकिटांचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा गैरव्यवहार भारतीय रेल्वेने उघडकीस आणला असून, या गैरव्यवहाराचे धागेदोरे परदेशात असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यात २६ जणांना अटक झाली असून, यात या टोळीचा भारतातील प्रमुख गुलाम मुस्तफा, पश्चिम भागप्रमुख दीपल शहा उर्फ डॅनी साहा याचाही समावेश आहे. या प्रकरणातील टोळी परदेशातील असून त्यांचे दुबईमध्ये मोठे कार्यालय आहे. या टोळीत सॉफ्टवेअर इंजिनीअरची टीम तसेच भारतातील प्रमुख गुलाम मुस्तफा, पश्चिम भाग प्रमुख दीपल शहा उर्फ डॅनी यांचाही समावेश आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे. (हेही वाचा - 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता' जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नव्या वादाला आमंत्रण)
दुबईमधून चालणाऱ्या या गैरव्यवहारात युगोस्लाव्हियातून आयपी अॅड्रेसचा वापर केला जातो. या टोळीमध्ये सुमारे 20 हजार तिकीट एजंटचा समावेश आहे. हमीद अश्रफ हा या टोळीचा प्रमुख असून तो दुबईमधून या टोळीचे नेतृत्व करतो. 2016 मध्ये अश्रफला अटक झाली होती. अश्रफचा उत्तर प्रदेशामध्ये गेल्या वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातही हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील दोन आठवड्यात रेल्वे पोलिसांनी या टोळीतील 26 जणांना अटक केली आहे. या टोळीतील भारतातील प्रमुख दीपल शहा उर्फ डॅनी साहा याला रेल्वे पोलिसांनी 22 जानेवारीला पश्चिम एक्स्प्रेसमधून बोरीवलीजवळ अटक केली आहे.
असा होत होता गैरव्यवहार -
रेल्वेचे ऑनलाइन बुकींग खुले होताच ही टोळी 40 सेकंदात 50 तिकिटे खरेदी करत होती. त्यासाठी 20 हजार एजंट सॉफ्टवेअरचा वापर करीत असतं. ही टोळी सामान्य लोक लॉग इन होण्यापूर्वीच तिकिटे खरेदी करून मोकळी होत असे. एकाच कम्प्युटरवरून 500 वेगवेगळे आयपी वापरून तिकिटे खरेदी केली जात असतं. त्यासाठी हमीद अश्रफ हा दररोज सकाळी मुस्तफाला नवे सॉफ्टवेअर पाठवित असे. त्यानंतर हे सॉफ्टवेअर पुढील 30 सुपर अॅडमिनला पाठविली जात होती. त्यानंतर सुपर अॅडमिन 300 प्रमुख विक्रेत्यांशी संपर्क करत असे. हे सॉफ्टवेअर पुढे 20 हजार एजंटमार्फत विक्री होत असे. मुस्तफाचे पाकिस्तान, बांगलादेश, पश्चिम आशिया, इंडोनेशिया आणि नेपाळमध्येही कनेक्शन्स असल्याचे उघड झाले आहे.