Uttarkashi Tunnel Collapse Rescue | Photo Credits: X)

Uttarkashi Tunnel Rescue Update: उत्तरकाशी बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी अडचण आली आहे. ऑगर मशिनने ड्रिलिंग करताना जाळी अडकल्याने कामकाजात अनेक अडचणी येत आहेत. 10 मीटर ड्रिलिंग करताना आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. 13 दिवसांपासून अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यासाठी ऑगर मशीनने ड्रिलिंग करताना वारंवार अडथळे येत आहेत. आता, अधिकारी व्हर्टिकल ड्रिलिंगच्या पर्यायावर विचार करत असून, त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, काही वेळानंतर होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत बचाव कार्याबाबत चर्चा होणार आहे. व्हर्टिकल ड्रिलिंगबाबत कोणताही निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. बचावकार्यात अजून वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचाव कार्यात सहभागी असलेल्या सरकारी यंत्रणांनी उभ्या ड्रिलिंगची तयारी सुरू केली आहे. ड्रिलिंगसाठी वापरले जाणारे मशीन पूर्णपणे स्थापित केले गेले आहे. (हेही वाचा - Uttarkashi Tunnel Collapse: बोगद्याच्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांचा पहिला व्हिडिओ समोर, बचाव कर्मचारी वॉकी-टॉकीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न)

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने उभ्या ड्रिलिंग साइटवर जाण्यासाठी आधीच रस्ता तयार केला आहे. इंडिया टुडेने गोळा केलेल्या व्हिज्युअल्समध्ये महिलांसह मजूर टेकडीच्या माथ्यावर जाऊन उभ्या ड्रिलिंगसाठी खोदकाम सुरू करताना दिसत आहेत. काही तासांच्या तांत्रिक बिघाडानंतर ड्रिलिंग पुन्हा सुरू झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी अडथळा आला. मेटल गर्डरला आदळल्यामुळे ऑगर मशीन मागे घेण्यात आले आणि तेव्हापासून बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी अमेरिकन-ऑगर मशीनचा वापर करणे अत्यंत कठीण आहे असे एका अधिकाऱ्यांने सांगितलं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, ज्यांनी शुक्रवारी सिल्क्यरा बोगद्याच्या जागेची पाहणी केली. त्यांनी सांगितले की बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, एनडीएमएचे अधिकारी लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त) यांनी प्रसारमाध्यमांना बचाव कार्य पूर्ण करण्याच्या टाइमलाइनबाबत गृहितक न ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चुकीचा समज निर्माण होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.