जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात संशयित अतिरिक्यांकडून भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला; शोधमोहीम सुरू
Terrorist Attack (Photo Credit:ANI)

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) शनिवारी पुन्हा एकदा सैन्य दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे. रामबन (Ramban) जिल्ह्यातील बाटोट-डोडा (Batote Doda) रोडवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास बाटोट येथे एनएच 244 वर 2 संशयितांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ड्रायव्हरने वाहन थांबवले नाही आणि जवळच्या सैन्याच्या चौकीला कळविले. त्यानंतर क्यूआरटीने (Quick Response Team) तपास सुरू केला आहे. बाटोटमध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. लष्कराची कारवाई अजूनही सुरूच आहे.

एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावर रामबानकडे जाताना बाटोटच्या नऊ किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला आहे. तेथे लष्कराची एक टीम ओपनिंग ड्युटीवर होती. त्यावेळी संशयित अतेरिक्यांनी गाडीत बसलेल्या सैनिकांवर हल्ला केला. त्यांनी सैन्यावर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. पण सैन्याने केलेल्या पलटवारानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला आहे. परंतु हे अतेरिकी रामबन येथे लपले असून, लष्कराकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा-आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर रोम मध्ये अ‍ॅसिड हल्ला

ANI चे ट्वीट-

भारतीय लष्कारांनी अतिरिक्यांना चारी दिशेने घेरले आहे. अतिरिक्यांच्या या हल्ल्यात अद्याप कुठल्याही जीवतहानीची खबर नाही असे लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या लष्कर दहशत वाद्यांचा शोध घेत आहे. सुरक्षा दले आणि अतिरिकी यांच्यात पुन्हा गोळीबार झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तान घुसखोरीच्या सर्व प्रयत्नांसह सीमेवर सतत अशांतता पसरवत आहे. तथापि, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या या योजना यशस्वी होऊ देत नाही. शनिवारी झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दल सतर्कतेवर आहेत.