प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

आळंदी (Alandi) येथे शिक्षणासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यावर रोम (Rome) येथे अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack)करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आळंदी येथे पीडित विद्यार्थी आमआयटी मध्ये संगणकशास्राचे शिक्षण घेत आहे. तर एका शैक्षणिक परिषदेत संशोधन प्रबंधन सादर करण्यासाठी तेथे गेला असता त्याच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हर्षित अग्रवाल असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशाचा रहिवासी आहे. मात्र शिक्षणासाठी हर्षित आळंदीत राहत आहे. रोममध्ये गेला कामासाठी गेला असता तेथे असलेल्या एका मेट्रो स्थानकात काही चोरट्यांनी त्याच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. तसेच त्याच्याजवळील कागदपत्रे आणि पैसेसुद्धा पळवले. अॅसिड हल्ला झाला असूनही धैर्याने हर्षित याने एक ट्वीट करत मदत मागितली. तसेच घरी घडलेल्या प्रकारचा किस्सा सांगितला.(ठाणे: सोन्याच्या दुकानात ग्राहकांना नव्या स्किमची भुरळ, पैसे गुंतवणुकीच्या नावाखाली मालकाकडून लाखो रुपयांचा गंडा)

या प्रकरणी त्याने रोम येथील पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच परराष्ट्र मंत्रालय स्तरावरुन त्याला मदतीसाठी यंत्रणा दाखल करण्यात आली. त्याचसोबत मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लतील इटलीच्या दूतवासांसोबत चर्चा केली. तर आता हर्शित सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.