Tamilnadu Accident: तामिळनाडूमध्ये अनियंत्रित कारचा भीषण अपघात, धडकी भरवणारा Video समोर
TAMILNADU accident Pc TWITTER

Tamilnadu Accident: तामिळनाडू राज्यात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. ही घटना शहरातील मदुराई येथे घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कार हवेत उडाली आणि दोन ते तीन वेळेस पलटी घेतली. अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वर्दळ होती. (हेही वाचा- धक्कादायक, मांजर वाचवण्याच्या नादत पाच जणांनी गमावला जीव)

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू येथील विरुधनगर- मदुराई महामार्गावर एक भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भरधाव रस्त्यावरून धावणारी कार हवेत उडाली. कार महामार्गावरून वेगात धावत होती. कार चालकाचे गाडीवरिल नियत्रंण सुटलं होते. त्यामुळे अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत एकुण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक कार डाव्या लेन मधून हळू चालणाऱ्या दुचाकीच्या मागे वेगाने जात असल्याचे दिसून आली. त्यानंतर गाडी आधी मोपेडला धडकली आणि त्यानंतर दुभाजकाला धडकली. कार हवेत उडाली. डिव्हाडरला धडकल्याने गाडी महामार्गाच्या दुसऱ्या लेनवर येऊन पुन्हा हवेत उडाली आहे. हवेत कारने तीन वेळा पलटी घेतली आहे.पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे. वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, मृत झालेल्या पाच जणांपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.