Tata Group's Market Value Higher Than Pakistan's GDP: संपूर्ण पाकिस्तानावर टाटा ग्रूप भरला भारी; टाटा समूहाचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त
Ratan Tata (Photo Credits: Getty Images)

Tata Group's Market Value Higher Than Pakistan's GDP: भारतातील सर्वात जुन्या औद्योगिक समुहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाचे बाजारमूल्य (Tata Group's Market Value) आता पाकिस्तान (Pakistan) च्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त झाले आहे. टाटा समूहाच्या (Tata Group) अनेक कंपन्यांनी गेल्या वर्षी प्रचंड कमाई केली आहे, त्यामुळे टाटा समूहाचे बाजारमूल्य सध्या 365 अब्ज डॉलर आहे. ही मूल्ये पाकिस्तानसाठी IMF च्या अंदाजे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) पेक्षा खूपच जास्त आहेत. टाटा समूहाची फक्त एक कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या निम्म्याएवढी आहे. अहवालानुसार, टाटा समूहाची फक्त एक कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे बाजार मूल्य $170 अब्ज आहे, जे पाकिस्तानच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळपास निम्मे आहे. TCS ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

टाटा समूहाचे बाजारमूल्य वाढवण्यात 'या' कंपन्यांचे योगदान -

ज्या कंपन्यांनी TATA समूहाचे बाजारमूल्य वाढवण्यात हातभार लावला आहे त्यात टाटा मोटर्स आणि ट्रेंट सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्या परताव्याच्या वाढीबरोबरच टायटन, टीसीएस आणि टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये झालेली वाढही समूहाचे बाजारमूल्य वाढवण्यात प्रभावी ठरली आहे. TRF, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्टसन इंजिनिअरिंगसह टाटा समूहाच्या 8 कंपन्यांची संपत्ती दुप्पट झाली आहे. (हेही वाचा - Tata iPhones: आता भारतामध्ये टाटा ग्रुप करणार 'आयफोन'ची निर्मिती; तैवानची कंपनी विस्ट्रॉनशी करार पूर्ण)

TCS ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी -

टाटा समूहाच्या ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे, ज्याचे बाजार मूल्य 170 अब्ज डॉलर आहे. त्याच वेळी, पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था फक्त एका कंपनीच्या दुप्पट म्हणजेच 341 अब्ज डॉलर्स आहे. याशिवाय टाटा समूहाची टाटा कॅपिटल पुढील वर्षी आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे बाजार मूल्य सुमारे 2.7 लाख कोटी रुपये आहे. (Tata Coffee Merger With Tata Consumer: टाटा समूहातील या कंपनीचे होणार विलीनकरण; शेअर्सच्या दरात वाढ)

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत घसरण -

भारतातील टाटा समूह झपाट्याने प्रगती करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था बऱ्याच काळापासून घसरणीच्या काळातून जात आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 6.1% आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये 5.8% ची मजबूत वाढ नोंदवूनही, पाकिस्तानची अर्थव्यवस्था 2023 मध्ये कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. आधीच गरिबीशी झुंजत असलेल्या पाकिस्तानमधील पुरामुळे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत आहे.

याशिवाय पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठाही केवळ 8 अब्ज डॉलर इतकाच राहिला आहे. याचाच अर्थ आता परदेशातून वस्तू आयात करण्यासाठी पाकिस्तानकडे फारसा पैसा नाही. त्याचबरोबर भारताचा परकीय चलनाचा साठा पाकिस्तानच्या तुलनेत 77 पट अधिक आहे. सध्या ते सुमारे 622 अब्ज डॉलर आहे.