Tata Coffee Merger With Tata Consumer: टाटा समूहातील या कंपनीचे होणार विलीनकरण; शेअर्सच्या दरात वाढ
टाटा कॉफी लिमिटेड आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे शेअर्स वधारले. टाटा कंझ्युमरचे शेअर 4.30 टक्क्यांनी वधारत 1086.80 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, टाटा कॉफीचे शेअर्स 4.14 टक्क्यांनी वधारत 320.90 रुपयांवर बंद झाला.
टाटा समूहातील टाटा कॉफी लिमिटेड (Tata Coffee Limited - TCL) आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड (Tata Consumer Products Limited - TCPL) आणि तिची पूर्ण मालकीची उपकंपनी TCPL बेव्हरेजेस अँड फूड्स लिमिटेड (TBFL) यांच्यातील विलीनीकरण योजना 1 जानेवारी 2024 पासून अंमलात येणार आहे. या योजनेनुसार, टाटा कॉफी कंपनीच्या कॉफीच्या मळा व्यवसाय टीसीपीएल बेव्हरेजेस अँड फूड्समध्ये डिमर्ज करणे आणि उर्वरित व्यवसाय टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये विलीन करणे समाविष्ट आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) कोलकाता खंडपीठाने या विलीनीकरणाला परवानगी दिली आहे. (हेही वाचा - Tata iPhones: आता भारतामध्ये टाटा ग्रुप करणार 'आयफोन'ची निर्मिती; तैवानची कंपनी विस्ट्रॉनशी करार पूर्ण)
टाटा समूहाच्या दोन प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली. टाटा कॉफी लिमिटेड आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे शेअर्स वधारले. टाटा कंझ्युमरचे शेअर 4.30 टक्क्यांनी वधारत 1086.80 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, टाटा कॉफीचे शेअर्स 4.14 टक्क्यांनी वधारत 320.90 रुपयांवर बंद झाला.
झारखंडमधील जमशेदपूर येथे वार्षिक तीन लाख क्षमतेचा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी कंपनी रु. 1,785 कोटींची गुंतवणूक करणार आहे. टीसीआयएलने सांगितले की, विस्तार प्रकल्पांतर्गत, हा प्लांट 2026 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. यामुळे सुमारे 600 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2023 09:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

