प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतात कोरोनाने (Coronavirus) अक्षरक्ष: थैमान घातले आहे. परिणामी, देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसायांसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनामुळे देशातील विविध परीक्षा रखडल्या किंवा रद्द झाल्या आहेत. दरम्यान, देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. यातच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे. इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अगोदर कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी. त्यानंतरच त्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारसमवेत झालेल्या बैठकीत आज बारावीतील सर्व मुलांना परीक्षेपूर्वी लसीची व्यवस्था करावी. मुलांच्या सुरक्षिततेशी खेळून परीक्षा आयोजित करण्याची जिद्द ही मोठी चूक आणि अपयश ठरेल. केंद्र सरकारची प्राथमिकता लसीकरण असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने एकतर Pfizer शी चर्चा केली पाहिजे आणि देशभरातील बारावीतील सर्व 14 दशलक्ष मुले आणि शाळांमधील जवळपास समान संख्येच्या शिक्षकांसाठी लस आणली पाहिजे. तसेच बारावीत शिकणारे सुमारे 95% विद्यार्थी 17.5 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 18 वर्षांपुढील नागरिकांना दिली जाणारी लस यांनाही दिली जाऊ शकते का? याबाबत केंद्र सरकारनं तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, असेही मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहेत. हे देखील वाचा- Covid-19 Vaccine Update: देशात Sputnik V लसीचे उत्पादन ऑगस्ट महिन्यापासून सुरु

ट्वीट-

कोरोनाच्या वाढत्या प्रादु्र्भावादरम्यान, देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 40 हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. एका दिवसात 3 हजार 741 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर, 3 लाख 55 हजार 102 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.