Swine Flu Outbreak in India: भारतात स्वाईन फ्लू अत्यंत जलद गतीने पसरत आहे. यात राजस्थान राज्यात स्वाईन फ्लूचे (Swine Flu) सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राजस्थानमध्ये एकूण 1036 रुग्ण आढळले असून यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, 1 जानेवारी 2019 पर्यंत 4,091 लोकांची तपासणी करण्यात आली त्यात 1036 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) आणि आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा (Health Minister Dr Raghu Sharma) यांनी आरोग्य विभागाला सावधानतेचा इशारा दिला आहे. (स्वाईन फ्लू: अमित शाह यांच्या आजारपणाचा भाजपवर काय परिणाम होणार?)
फक्त राजस्थानमध्येच नाही तर गुजरात, दिल्ली, हरयाणा राज्यातही स्वाईन फ्लू तोंड वर काढत आहे. हाती आलेल्या रिपोर्ट्सनुसार, दिल्लीत 168 तर हरयाणात 128 स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळून आले आहेत. इतकंच नाही तर हरयाणात स्वाईन फ्लू मुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूची नेमकी लक्षण कोणती ?
जानेवारी 2018 च्या रिपोर्टनुसार, स्वाईन फ्लू रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. जानेवारी 2018 मध्ये स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 798 होती.
According to Rajasthan Health Department: 65 cases of Swine Flu were found positive across the state today. One death was reported in Churu. Till now, total 1036 cases of Swine Flu have been found positive & 40 deaths have been reported in the state.
— ANI (@ANI) January 17, 2019
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू चे 65 रुग्ण होते. त्यापैकी एकाच मृत्यू झाला. तर जोधपूर जिल्ह्यात 16 जणांचा स्वाईन फ्लू ने बळी गेला आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर, शिकर येथे स्वाईन फ्लूचे तीन बळी गेले असून कोटा, प्रयागराज आणि अजमेर, गंगानगर, पाली, उदयनगर, राजसमंद आदी ठिकाणी स्वाईन फ्लूमुळे प्रत्येकी दोन बळी गेले आहेत.