BJP Chief Amit Shah | (Photo courtesy: archived, edited, representative image)

स्वाईन फ्लू (Swine Flu) झाल्यामुळे आपण दिल्ली येथे एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह (BJP Chief Amit Shah ) यांनी ट्विटरद्वारे दिली आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच अस्वस्थता पसरली. पक्षाने हाती घेतलेल्या आगामी कार्यक्रमांचे काय करायचे हा प्रश्न देशभरातील भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात निर्माण झाला. कारण, भाजपचे नजीकच्या काळातील बहुतांश कार्यक्रम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांना केंद्रस्थानी ठेऊनच आखण्यात आले होते. अलिकडील काळात पक्षाचे सर्वच कार्यक्रम बहुदा अमितशाह किंवा पंतप्रधान मोदी केंद्री असतात. त्यामुळे तेच जर कार्यक्रमाला उपस्थित नसतील तर, त्या कार्यक्रमांबाबत काय निर्णय घ्यायाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अमित शाह हे लवकर बरे होऊन पुन्हा एकदा पक्षकार्याला सुरुवात करतील. मात्र, तोपर्यंत भाजपला कोणकोणत्या ठिकाणी फटका बसणार याचा घेतलेला एक संक्षित्प आढावा.

पश्चिम बंगाल येथील रथयात्रेवर परिणाम

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने केलेल्या तीव्र विरोधानंतर भाजपकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या रथयात्रेस 20 जानेवारी पासून सुरुवात होणार होती. भाजपच्या स्थापनेपासून पश्चिम बंगालमध्ये शिरकाव करण्यासाठी भाजप प्रयत्न करतो आहे. पण, त्याला म्हणावे तसे यश मिळत नव्हते. दरम्यान, रथयात्रेच्या निमित्ताने भाजपला ती संधी होती. मात्र, शाह यांच्या आजारपणामुळे या रथयात्रेवर परिणाम होऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये भाजप अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली 5 रॅलींचे आयोजन केले आहे. त्यापैकी 20 जानेवारीला मालदा जिल्ह्यात, 21 जानेवारीला बीरभूम आणि पश्चिम मिदनापूर येथे दोन रॅली, 22 जानेवारीला इतर दोन ठिकाणी जाहीर सभा तर दंड 24 परगान आणि नादिया जिल्ह्यातही रॅलींचे आयोजन आहे. 8 फेब्रुवारीला कलकत्ता येथे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमांवर अमित शाह यांच्या आजारपणाचा परिणाम होऊ शकतो.

कर्नाटकमध्येही मोठी अडचण

कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्याता वर्तवली जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकमधील 104 भाजप आमदार माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासोबत राजधानीजवळील गुरुग्राम येथील एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यात आले आहेत. या आमदारांसोबत येडियुरप्पा सातत्याने पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट मागत आहेत. ही भेट झाल्यास आणि शाह यांनी हिरवा कंदील दाखवल्यास कर्नाटकमध्ये सत्तांतराची त्सुनामी येऊ शकते. पण, त्यावरही शाह यांच्या आजारपणामुळे परिणाम होऊ शकतो. (हेही वाचा, स्वाईन फ्लू: भाजप अध्यक्ष अमित शाह रुग्णालयात दाखल; पक्षकार्यात मोठा अडथळा)

येत्या काळात भाजपकडून 50 पेक्षाही अधिक पत्रकार परिषदांचे आयोजन

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने 50 पेक्षाही अधिक पत्रकार परिषदांचे आयोजन करण्याचे ठरवले होते. या पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जाहिरनामा समितीच्या बैठकाही सुरु करण्यात आल्या होत्या. या पत्रकार परिषदांमधून भाजप सरकारच्या विकासकामांचा आणि योजनाची माहिती जनतेला देण्यात येणार होती. दरम्यान, त्यावरही परिणाम होऊ शकतो.