Tamilnadu Shocker: धक्कादायक, एक्स्ट्रा सांभार देण्यास नकार दिल्याने पिता पुत्राने केली हॉटेल मालकाची हत्या
Chennai Murder PC TWITTER

Tamilnadu Shocker: तमिळनाडूतील चैन्नईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चैन्नईतील एका रेस्टॉरंटमध्ये एक्स्ट्रा सांभार देण्यास नकार दिल्याने पिता पुत्राने हॉटेल मालकाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर चैन्नई हादरली आहे. पिता पुत्र हॉटेलमध्ये इडिली सांभर खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी एस्क्ट्रा चटणी मागितली. परंतु हॉटेल मालकाने चटणी देण्यास नकार दिली या गोष्टीचा राग आल्याने पिता पुत्राने हॉटेल मालकाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली.

प्राप्त माहितीनुसार, चैन्नई येथील पल्लवरम येथे एक हॉटेल आहे. हे हॉटेल अरून नावाचा व्यक्ती चालवत होता. हॉटेलमध्ये इडिली आणि सांभार खाण्यासाठी पिता पुत्रे आले होते. त्यावेळी दोघांन्ही इडिली खाण्यासाठी एक्स्ट्रा सांभार मागितला होता. कर्मचाऱ्यांनी सांभार देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांन्ही मालकासोबत वाद घातला, परंतु हा वाद अगदी टोकाला पोहचला. त्यानंतर पिता पुत्राने दोघांन्ही मिळून कर्मचाऱ्याला मारहाण केली. मारहाणीमुळे हॉटेलमध्ये बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

बेदम मारहाणीची परिस्थिती सांभाळण्यासाठी अरुण हा मध्यस्थी करण्यास गेला. त्यानंतर दोघांन्ही मिळून अरुणाला ही मारहाण केली. या मारहाणीत अरुणला गंभीर दुखापत झाली. तो बेशुध्द पडला.त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. आणि शंकर आणि अरुण कुमार या दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दोघांवर मारहाणीचा आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजले आहे.