शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस ( Shiv Sena-Nationalist Congress-Congress) अशी नवी आघाडी जन्मास घालत महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याबाबत विचारविनीमय करण्यासाठी शरद पवार (harad Pawar) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या पक्षाध्यक्षांची एक बैठक राजधानी दिल्लीत आज पार पडली. सुमारे 45 मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तापेच सोडविण्याबाबत बराच खल झाला. मत्र, प्रदीर्घ काळ चाललेल्या या बैठकीत मात्र अद्यापही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. बोलणी सकारात्मक झाली तरीही अतिंम निर्णय झालाच नाही. . या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (harad Pawar) यांनी सोनिया गांधी यांच्या बैठकीत राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे चर्चेच्या गुऱ्हाळात महाराष्ट्रातील सत्तास्तापनेचा मुहूर्त मात्र लांबणीवर पडल्याचे पुन्हा एकदा समोर आले.
सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी सवाद साधला. आयजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील सध्यास्थितीवर आमच्यात चर्चा झाली. मात्र, कोणत्याही पक्षासोबत चर्चा करण्याबाबत आम्ही चर्चा केली नाही. त्यामुळे आमच्यासोबत असलेल्या आघाडीतील इतर घटक पक्षांनाही चर्चेत घेऊन विचार केला जाईल, असे पवार म्हणाले. (हेही वाचा, 3 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आणि 2 वर्ष शिवसेनेचा: संजय राऊत यांनी नवा फॉर्म्युला दिल्याचा रामदास आठवले यांनी केला खुलासा)
एएनआय ट्विट
Sharad Pawar on if Sonia Gandhi is opposed to forming Govt in alliance with Shiv Sena: There was no talk of Govt formation in our meeting, this meeting was all about discussing Congress and NCP. https://t.co/26TnM7lhRf pic.twitter.com/rghFDkuc6A
— ANI (@ANI) November 18, 2019
शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्रात सरकारस्थापनेबाबत निर्माण झालेला पेच सुटला नाही. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी नवी आघाडी आकाराला आणत सरकार बनविण्याबाबत प्रयत्न सुरु झाले. मात्र या प्रयत्नांना अद्यापही यश आले नाही.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकालानुसार संख्याबळाचा विचार करता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी युती करुन निवडणूक लढलेल्या भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांची आहे. मात्र, मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समसमान वाटप यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आणि सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.