Dr K.M Cherian Passes Away: देशातील पहिली यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया (Coronary Artery Surgery) आणि पहिले हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण यासाठी प्रसिद्ध असलेले प्रख्यात सर्जन डॉ. के. एम. चेरियन (Dr K.M Cherian) याचे बेंगळुरू येथे निधन झाले. शनिवारी रात्री वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. चेरियन यांनी फ्रंटियर लाईफलाइन आणि डॉ. चेरियन हार्ट फाउंडेशनची स्थापना केली. त्यांना 1991 मध्ये पद्मश्रीसह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतातील पहिली कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया -
डॉ. के. एम. चेरियन यांनी 1975 मध्ये चेन्नईतील पेरांबूर येथील सदर्न रेल्वे मुख्यालय रुग्णालयात भारतातील पहिली यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया केली. याशिवाय, चेरियन यांनी पहिले हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, पहिले बालरोग प्रत्यारोपण देखील केले आहे. चेरियन यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, चेरियन बंगळुरूमध्ये असलेले एका लग्नात सहभागी झाले होते. त्यानंतर तेथे ते कोसळले. त्यानंतर त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जिथे रात्री 11.55 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - COVID-19 Booster Dose Can Do More Harm: कोविड-19 बूस्टर डोस यावेळी चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतो, एम्सच्या डॉक्टराचा दावा; काही तज्ञ असहमत)
डॉ. के. एम. चेरियन यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा-
डॉ. के. एम. चेरियन यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. डॉ. चेरियन हे केवळ एक सर्जन नव्हते तर एक दूरदर्शी व्यक्तीमत्त्व होते. त्याच्या अपवादात्मक कौशल्यामुळे आणि समर्पणामुळे त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.
दरम्यान, चेन्नईतील रेल्वे रुग्णालयात सेवा दिल्यानंतर, त्यांनी फ्रंटियर लाईफलाइन आणि डॉ. चेरियन्स हार्ट फाउंडेशनची स्थापना करण्यापूर्वी विजया हॉस्पिटल आणि मद्रास मेडिकल मिशनसह अनेक खाजगी रुग्णालयात काम केले. डॉ. चेरियन यांनी 1990 ते 1993 पर्यंत भारताच्या राष्ट्रपतींचे मानद सर्जन म्हणूनही काम केले. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात 2005 मध्ये पद्मश्री आणि हार्वर्ड मेडिकल एक्सलन्स अवॉर्ड यांचा समावेश आहे.