Photo Credit- X

Rajsamand Road Accident: राजस्थानच्या राजसमंदमध्ये (Rajsamand) शाळकरी मुलांना घेऊन जाणारी खासगी बस उलटली. चारभुजा पोलीस ठाण्याच्या (Charbhuja Police Station) हद्दीत आज पहाटे हा अपघात झाला. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, शाळकरी मुलांना घेऊन जाणारी खासगी बस परशुराम महादेव येथून चारभुजा येथून रणकपूरकडे जात असताना चाकलाचे बसवरील नियंत्रण सुटले. आणि ती उलटली. या अपघातात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर 24 हून अधिक मुले जखमी झाल्याचे समजते.

खासगी बसमधून शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात