पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Noida International Airport) भुमिपुजन केले. दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील करोडो लोकांना या विमानतळाचा फायदा होणार आहे. पीएम मोदी म्हणाले की, हे विमानतळ विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे सर्वात मोठे केंद्र असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट मॉडेल बनेल, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणातात, “येथे येण्यासाठी टॅक्सीपासून मेट्रो आणि रेल्वेपर्यंत सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी असेल. आज ज्या वेगाने देशात विमान वाहतूक क्षेत्र वाढत आहे, ज्या वेगाने भारतीय कंपन्या शेकडो नवीन विमाने खरेदी करत आहेत, त्यात नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळही त्यांच्यासाठी मोठी भूमिका बजावेल.
पुढे म्हणतात, सध्या आम्ही 85 टक्के विमाने परदेशात सेवेसाठी पाठवतो, ज्यामध्ये दरवर्षी 15,000 कोटी रुपये खर्च केले जातात. ही परिस्थिती बदलण्यासाठी हे विमानतळही खूप महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लॉजिस्टिकच्या दृष्टिकोनातून देशाचे प्रवेशद्वार बनवले जाणार आहे. या विमानतळामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो लोकांना नवीन रोजगारही मिळेल. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशला बऱ्याच गोष्टी पासुन लांब राहायला लागले, आधीच्या सरकारांनी राज्याला वंचित आणि अंधारात ठेवले. ते म्हणाले, “स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर, प्रथमच उत्तर प्रदेशला हे सगळ मिळू लागले आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे आज उत्तर प्रदेश देशातील सर्वात कनेक्टेड प्रदेश बनत आहे. (हे ही वाचा 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये मिळू शकते खुशखबर! वेतनात भरघोस होणार वाढ.)
या विमानतळाच्या उभारणीनंतर उत्तर प्रदेश हे देशातील एकमेव असे राज्य बनेल जिथे 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असतील. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दबाव कमी होण्यास मदत होईल. हे प्रत्येक गोष्टी स्थिर असेल, आणि दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, अलीगढ, आग्रा, फरीदाबादसह शहरी लोकसंख्येला आणि शेजारच्या भागांना सेवा देण्यास मदत होईल.
विमानतळाचे काम पुर्ण वेळेत होणार
पंतप्रधान म्हणाले की नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी निर्यातीचे एक मोठे केंद्र जोडेल गेले आहे. जेवर विमानतळाचे काम दिल्ली-लखनौ सरकारमध्ये अडकून राहिले आहे. विमानतळाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले. यूपीमधील पूर्वीच्या सरकारने तत्कालीन केंद्र सरकारला पत्र लिहून हा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी केली होती, परंतु आज ‘डबल इंजिन’ सरकारच्या बळावर आम्ही प्रकल्पाच्या पायाभरणीचे साक्षीदार झालो आहोत.
1,300 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला प्रकल्प
केंद्र सरकारने म्हटले आहे की विमानतळाचा पहिला टप्पा 10,050 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला जात आहे. हे 1,300 हेक्टरपेक्षा जास्त पसरलेले आहे. पहिल्या टप्प्याच्या बांधकामानंतर, विमानतळाची क्षमता वार्षिक 12 दशलक्ष प्रवासी होईल. बांधकामाचे काम वेळापत्रकानुसार सुरू असून ते 2024 पर्यंत पूर्ण होईल.
योजनेनुसार, विमानतळावर मेट्रो आणि हायस्पीड रेल्वेसाठी स्थानके असतील. याशिवाय टॅक्सी, बससेवा आणि खासगी वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. अशाप्रकारे विमानतळ थेट रस्ते, रेल्वे आणि मेट्रोने जोडले जाईल आणि नोएडा आणि दिल्ली अखंड मेट्रो सेवेद्वारे जोडले जातील.