www.corruptmodi.com भाजप, मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून 'डिजिटल हल्ला'
पंतप्रधान नरेंद्र मोदी (छायाचित्र सौजन्य - दूरदर्शन)

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन 2014च्या लोकसभा, विधानसभा, निवडणुकीत भाजपने रान पेटवले. विजय संपादन केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आक्रमक असलेल्या भाजपला प्रत्त्युत्तर देतान सत्ताधारी काँग्रेसलाही तेव्हा काहीसे बॅकफूटवर जावे लागले होते. भाजपच्या आक्रमक प्रचारापुढे संबंध निवडणुकीत काँग्रेस बचावात्मक प्रचार करताना दिसली. दरम्यान, भाजपच्या याच शैलीचा वापर करत विरोधकांनी भाजपला त्याच भाषेत प्रत्त्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. या प्रत्युत्तरात खास करुन डिजिटल मीडियाचा मोठा वापर केला जात आहे. निवडणूक प्रचार आणि पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने डिजिटल मीडियाचा खूबिने वापर करुन घेतला. डिजिट मीडियाची ताकद ओळखून विरोधकांनीही आता भाजपला तोडीस तोड उत्तर देताना दिसत आहे. त्यामुळेच कदाचीत मोदी आणि भाजप विरोधकांकडून www.corruptmodi.com अशी चक्क एक वेबसाईटच सुरु करण्यात आली आहे.

www.corruptmodi.com ही वेबसाईट सध्या राजकीय वर्तुळात भलतीच चर्चेचा विषय ठरली आहे. वेबसाईटची रचनाही युजर्सला हाताळायला सोपी असेल याकडे लक्ष देण्यात आले आहे. वेबसाईटला भेट दिल्यावर ओपन होणाऱ्या होमपेजच्या डाव्या बाजूला ए टू झेड अशा कॅटेगरीआहे. या कॅटेगरीतील कोणत्याही अक्षरावर क्लिक केल्यास प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या बातम्यांच्या लिंक पाहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे या वेबसाईटवर प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांच्या केवळ लिंकच दिलेल्या आहेत. लेख, आरोप, विरोधी नेत्यांची भाषणे असा कोणताही मजकूर, व्हिडिओ किंवा कंटेट साईटवर पाहायला मिळत नाही. मोदी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या लिंक एकत्र देणारी न्यूज अॅग्रिगेटर साईट असंच काहीस या वेबसाईटचं स्वरुप आहे. (हेही राजस्थानमध्ये राजपूत समाज भाजपवर नाराज, डॅमेज कंट्रोलसाठी वरिष्ठ नेत्यांची धावाधाव)

या साईटवर दिलेल्या घोटाळ्यांच्या काही लिंकचे विषय पुढीलप्रमाणे:

निरव मोदी घोटाळा, राफेल घोटाळा , पीडीएस घोटाळा, व्यापम घोटाळा, खाण घोटाळा, जय शाह घोटाळा, पियुष गोयल घोटाळा, मनरेगा घोटाळा, महाकुंभमेळा घोटाळा, बिटकॉइन घोटाळा

अॅडमीनची ओळख गुप्त

या साईटचे आणखी एक वैशिष्ट असे की, या साईटवर साईटबाबतत काहीही माहिती देण्यात आली नाही. जसे की, ही साईट कोणी सुरु केली, ही साईट सुरु करण्यामागे कोण आहे असा काहीच मजकूर या साईटवर नाही. थोडक्यात सांगायचे तर आमच्याबद्दल असे प्रत्येक वेबसाईटवर असणारा आणि स्वत:बद्दल माहिती देणारा भागच या वेबसाईटवर उपलब्ध नाही. वेबसाईट अॅडमीनची ओळख पटत नाही. त्यामुळे ही वेबसाईट सुरु करण्याचे काम नेमके कोणाचे? ही वेबसाईट विरोधकांनीच सुरु केली आहे का त्यामागे सत्ताधारी वर्तुळातीलच असंतृष्ठ गट कार्यरत आहे? याबाबत कोणतीच माहिती मिळू शकली नाही. मात्र, साईटवरचा एकूण लूक आणि साईटवर शेअर केलेल्या लिंक पाहता मोदी विरोधकाचेच हे काम असल्याचे मानन्यास जागा आहे.