Rajasthan Assembly Election 2018: राजस्थानमध्ये राजपूत समाज भाजपवर नाराज, डॅमेज कंट्रोलसाठी वरिष्ठ नेत्यांची धावाधाव; विजयाचे आव्हान
राजस्थानमध्ये विजयासठी वसुंधरा राजे यांचा निकराचा संघर्ष ((Archived, edited, images)

Rajasthan Assembly Election 2018: राजस्थान (Rajasthan) विधासभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप (BJP) आक्रमक प्रचार करतो आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार रास्थानमध्ये काम करत आहे. राजस्थानचा विधानसभा निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहता या वेळी भाजपसाठी सामना तितका सोपा नाही. सरकार विरोधी लाट आणि नाराज असलेला राजपूत समाज (Rajput Community) भाजपसाठी धोकादायक ठरु शकते. राजकीय तज्ज्ञ आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा धोका इतका वाढला आहे की, खुद्द मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje)यांनाच आपल्या मतादसंघात विजयासाठी निकराचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मतदारसंघातील नाराज राजपूत नेत्यांनी भाजपला आपली ताकद दाखवून देण्याचा इशाराही दिला आहे. अशा स्थितीत भाजपला काँग्रेस (Congrss)ला सत्तेत पुनरागमन करण्यापासून रोखण्याचे आणि राजपूतांना सांभाळण्याचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे.

भाजपला गुंडागर्दी बंद करण्याचा इशारा

राजस्थानमध्ये भाजपला बालेकिल्यातूनच आव्हान मिळत असल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने हाडौती हा प्रदेश चर्चेत आहे. हाडौती हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. पाठिमागच्या विधानसभा निवडणुकीत हाडौती, कोटा, बूंदी, बरां आणि झालावाड जिल्ह्यातून भाजपला तब्बल १७ जागा मिळाल्या होत्या. तुलनेत राष्ट्रीय काँग्रेसला केवळ एका जागेवर निसटता विजय मिळाला होता. झालावाड जिल्ह्यातील ४ विधानसभा जागा डग, झालरापाटन, खानपूर आणि मनोहर ठाणे या मतदारसंघावर भाजपचे प्रभुत्व असल्याचे मागच्या वेळी दिसून आले होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे हे कार्यक्षेत्र आहे. तर, त्यांचे पूत्र दुष्यंत सिंह येथूनच लोकसभेवर भाजपचे प्रतिनिधित्व करतात. विद्यामान परिस्थिती वेगळी आहे.

भाजपच्या या बालेकिल्ल्यातच भाजपला काँग्रेसकडून आव्हान मिळताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला राजपूत समाजही भाजपवर नाराज असल्याने भाजपला एकाच वेळी काँग्रेस आणि राजपूतांची नाराजी अशा दोन्ही आघाड्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पोलीसांकडून कायद्याची अंमलबजावणी करताना राजपूत समाजाच्या काही लोकांना मारहाण झाली. या प्रकाराचा आपल्यावरील अन्यायाशी जोडत राजपूत समाजातील काही नेत्यांनी भाजपला पोलिसांकडून केली जाणारी गुंडागर्दी बंद करावी अन्यथा या निवडणुकीत आम्ही ताकद दाखवू असा इशारा दिला आहे. यात करणी सेना आघाडीवर आहे. (हेही वाचा, वसुंधरा राजे यांच्याकडून भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध)

राजनाथ सिंह ( Rajnath Singh) यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

दरम्यान, भाजप आणि पर्यायाने वसुंधरा राजे यांच्या विरोधात निवडणुकीला उभे असलेल्या मानवेंद्र सिंह यांना विजयी करण्याचे अवाहनही करणी सेनेने केले आहे. राजस्तानमध्ये रजपूतांचा भाजपवर असलेल्या रागाजी दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही घेण्यात आली आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी भाजपचे स्टार प्रचारक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh) यांना थेट लक्ष घालावे लागत आहे.

राजपूतांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे असलेली जमेची बाब म्हणजे येथील माजी खासदार, मोठे राजपूत नेते आणि राजघराण्यांशी चांगला संबंध असलेले इज्यराज सिंह ( Ijyaraj Singh) यांनी या वेळी काँग्रेस (Congrss)सोडून भाजपला हात दिला आहे. त्यामुळे या वेळी भाजपला राजस्थानमध्ये विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.