Amit Shah | (Photo Credit: ANI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबाबत सोशल मीडियात एक गोष्ट व्हायरल होत होती. त्यात असे म्हटले होते की, अमित शहा यांची प्रकृती गंभीर असून त्यासंदर्भातील ट्वीट त्यांच्या अकाउंटवरुन करण्यात आल्याचे दिसून आले होते. त्याचसोबत अमित शाह यांना हाडांचा कॅन्सर असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु या सगळ्यावर आता खुद्द अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले असून या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. अमित शहा यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मी पूर्णपणे बरा असून मला कोणताही आजार नाही आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शहा यांच्या प्रकृतीसंदर्भात गंभीर अफवा पसवरल्यानंतर त्यांच्या मृत्यूसाठी सुद्धा ट्वीट करुन प्रार्थना केल्याचे दिसून आले होते.

देशावर सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट ओढावले असून त्याच्या विरोधात आपण लढत आहोत. देशाचा गृहमंत्री या नात्याने रात्री उशीरापर्यंत कामात व्यस्त असल्याने प्रकृती संदर्भातील या अफवेच्या गोष्टीकडे लक्ष नाही दिले. मात्र यावर लोक कल्पना करत असून त्याबाबत मी अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. परंतु पक्षातील लाखो कार्यकर्ते आणि माझ्या शुभचिंतकांनी गेल्या दोन दिवसात यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. त्यामुळेच मी आज स्पष्टीकरण देत असे सांगत आहे की, मी पूर्णपणे बरा असून मला कोणताही आजार नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.(Fact Check: गृहमंत्री अमित शाह हाडांच्या कॅन्सरने त्रस्त आहेत? त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फेक ट्वीट मागील सत्य, घ्या जाणून)

हिंदू मान्यतांनुसार असे मानले जाते की, या प्रकारच्या अफवा आरोग्याला अधिक मजबूत बनवतात. त्यामुळे मी लोकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांना या व्यर्थ गोष्टी सोडून मला माझे कार्य करु द्या आणि तुम्ही सुद्धा करा. त्याचसोबत अमित शहा यांनी त्यांच्या शुभचिंतकांनी आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केल्याने त्यांचे आभार मानले आहेत. ज्या लोकांनी माझ्या बाबत अशा प्रकारची अफवा पसरवली आहे त्यांच्याबद्दल सुद्धा मला कोणतीी दुर्भावना किंवा द्वेष नसून त्यांचे ही आभार अमित शहा यांनी मानले आहेत.