Smriti Irani on Congress: स्मृती इराणींच्या मुलीबाबत कॉंग्रेसचा खळबळजनक दावा, इराणींचा प्रत्योत्तर देत कॉंग्रेसवर घणाघात
Union Minister Smriti Irani (Photo Credits: ANI)

आज सकाळी कॉंग्रेसने (Congress) पत्रकार परिषद घेतली. दरम्यान केंद्र सरकारवर (Central Governement) टीका करत कॉंग्रेसकडून भाजप खासदार स्मृती इराणींच्या (Smriti Irani) मुलीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गोव्यात (Goa) स्मृती इराणींच्या कन्येच एक रेस्टॉरंट (Restaurant) म्हणजेच बार (Bar) आहे पण स्मृती इराणी ज्या पक्षाच्या खासदार आहेत त्यानुसार इराणींच्या मुलीचा तो बार संस्कारी बार असेल असा टोला कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा (Pavan Kheda) यांनी लगावला आहे. तसेच इराणींच्या मुलीच्या बारचं लाईसन्स (Licence) बोगस असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आलं आहे. बारचं लाईन्स एका अशी व्यक्तीच्या नावावर आहे ज्यांचा मृत्यू मे 2021 मध्ये झालेला आहे. म्हणजे  13 महिन्यापूर्वी  मृत्यू  झालेल्या व्यक्तीच्या लायसन्सवर इराणींची मुलगी बार चालवते असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

 

संबंधित आरोपांवर केंद्रीय मंत्री इराणी यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. कॉंग्रेसकडून या प्रकरणी जे दस्तावेज दाखवण्यात आले आहेत त्यात माझ्या मुलीचे नाव कुठे आहे, असा थेट सवाल स्मृती ईरानी यांनी कॉंग्रेसला विचारला आहे. माझी मुलगी 18 वर्षांची कॉलेजची (College) विद्यार्थी असुन तिची यात काहीही चूक नाही हो पण तिची चूक एवढीचं आहे की तिच्या आईने राहूल गांधी (Rahul Gandhi) विरुध्द 2014 आणि 2019 मध्ये अमेठी मधून लोकसभा निवडणूक लढवली, असं विधान करत केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. (हे ही वाचा:-Sanjay Raut: आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात पण उद्या लोक तुमची गाढवावरुन धिंड काढतील, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल)

 

इराणी म्हणाल्या माझ्या मुलीवर हे गंभीर आरोप काँग्रेस नेतृत्वाच्या म्हणजेच गांधी कुटुंबाच्या निर्देशानुसार केले जात आहे. कारण भारतीय तिजोरीच्या 5,000 कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढत मी थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जाब विचारला होता, त्याचा सुड म्हणून माझ्या मुलीवर हे आरोप करण्यात येत आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. तसेच 2024 मध्ये कॉंग्रेसकडून राहूल गांधींनी अमेठी मधून लोकसभा निवडणूक  लढवली तरी मी त्यांना पुन्हा एकदा पराभूत करेन असं आव्हान स्मृती इराणी यांनी दिलेल आहे.