Sanjay Raut: आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात पण उद्या लोक तुमची गाढवावरुन धिंड काढतील, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

राज्यात सरकार स्थापन होवून आज जवळजवळ 23 दिवस झालेत पण सत्तासंघर्षासह प्रतिष्ठेची लढाई संपण्याचं काही चिन्ह नाही. सत्ताधारी विरुध्द विरोधक नाही तर शिवसेना (Shiv Sena) विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) रंगला आहे. कुठली शिवसेना खरी आणि कुठली शिवसेना खोटी ही प्रतिष्ठेची लढाई राज्यात बघायला मिळत आहे. तरी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. तसेच महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात पण उद्या लोक तुमची गाढवावरुन धिंड काढतील असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.

 

संजय राऊत म्हणाले, ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेत घाव घातले आहेत, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणली आहे त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. तसेच ज्यांनी दिल्लीच्या (Delhi) आदेशाने शिवसेनेवर पुरावे देण्याची वेळ आणली आहे त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आत्मा लक्ष ठेवून आहे, तो तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. तसेच याचं मातीत तुम्ही संपाल असं वक्तव्य संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलं आहे. (हे ही वाचा:-Kishori Pednekar on Nitesh Rane: शिवसेना संपवण्यासाठी काही लोकांनी सुपारी घेतली, किशोरी पेडणेकरांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर)

 

 

शिंदे सेना विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. तरी दोन्ही कडून रोजी आरोप प्रत्यारोपाची मालिका दोन्ही बाजूने बघायला मिळते. असलेली शिवसेना सावरण्यासाठी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच महाराष्ट्रा दौरा करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.