गेल्या आठवड्यात कॉंग्रेसने (Congress) पत्रकार परिषद घेत दरम्यान केंद्र सरकारसह (Central Governement) भाजप खासदार स्मृती इराणींच्या (Smriti Irani) मुलीवर गंभीर आरोप करण्यात आले. गोव्यात (Goa) स्मृती इराणींच्या कन्येच एक रेस्टॉरंट (Restaurant) म्हणजेच बार (Bar) आहे पण स्मृती इराणी ज्या पक्षाच्या खासदार आहेत त्यानुसार इराणींच्या मुलीचा तो बार संस्कारी बार असेल असा टोला कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा (Pavan Kheda) यांनी लगावला आहे. तसेच इराणींच्या मुलीच्या बारचं लाईसन्स (Licence) बोगस असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आलं आहे. बारचं लाईन्स एका अशी व्यक्तीच्या नावावर आहे ज्यांचा मृत्यू मे 2021 मध्ये झालेला आहे. म्हणजे 13 महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या लायसन्सवर इराणींची मुलगी बार चालवते असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला होता.
तसेच कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh), प्रवक्ते पवन खेडा आणि प्रशांत प्रताप (Prasahnt Pratap) यांनी स्मृती इराणींच्या मुलीबाबत काही ट्वीटही (Tweet) केले होते. त्या संबंधीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेत मानहानीचा दावा ठोकला. याबाबत न्यायालयाकडून या तीनही कॉंग्रेस (congress) नेत्यांना समन्स (Summons) बजावण्यात आला असुन स्मृती इराणींच्या मुलीबाबत केलेले सगळे ट्वीट डिलीट (Delete) करायला सांगितले आहेत. तरी यावर प्रत्युत्तर देत आम्ही कोर्टासमोर तथ्य मांडण्याची वाट पाहत आहोत. स्मृती इराणी यांनी आम्ही आव्हान देऊ आणि त्यांचे आरोप खोटे ठरवू,” असं ट्वीट जयराम रमेश यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- Smriti Irani on Congress: स्मृती इराणींच्या मुलीबाबत कॉंग्रेसचा खळबळजनक दावा, इराणींचा प्रत्योत्तर देत कॉंग्रेसवर घणाघात)
Illegal Bar row: Delhi High Court issues summons to Congress leaders Jairam Ramesh, Pawan Khera and Netta D'souza in civil suit filed by Union Minister Smriti Irani
— ANI (@ANI) July 29, 2022
The Delhi High Court has issued notice asking us to formally reply to the case filed by Smriti Irani. We look forward to presenting the facts before the court. We will challenge and disprove the spin being put out by Ms. Irani.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 29, 2022
इराणी म्हणाल्या माझ्या मुलीवर हे गंभीर आरोप काँग्रेस नेतृत्वाच्या म्हणजेच गांधी कुटुंबाच्या निर्देशानुसार केले जात आहे. कारण भारतीय तिजोरीच्या 5,000 कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढत मी थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जाब विचारला होता, त्याचा सुड म्हणून माझ्या मुलीवर हे आरोप करण्यात येत आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. तसेच 2024 मध्ये कॉंग्रेसकडून राहूल गांधींनी अमेठी मधून लोकसभा निवडणूक लढवली तरी मी त्यांना पुन्हा एकदा पराभूत करेन असं आव्हान स्मृती इराणी यांनी दिलेल आहे.