Ashok Gehlot VS Sachin Pilot | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजस्थानमधील सत्तासंघर्ष अखेर सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या काँग्रस पक्षासोबत झालेल्या मनोमिलनाने झाली. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्ली येथे काल (10 ऑगस्ट) पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली. त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर सचिन पायलट यांची वाट काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर पायलट राजस्थानला परतले. राजस्थानमध्ये समर्थकांकडून सचिन पायलट यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. या वेळी पायलट समर्थकांनी 'I love You.. I love You सचिन पायलट I love You' अशा घोषणा दिल्या.

जयपूर येथे पोहोचलेल्या सचिन पायलट यांनी आज (11 ऑगस्ट) सांगितले की, आपली भूमिका मांडण्यासाठी आवाज उठवणे हे कोणत्याही प्रकारचे बंड नसते. मधल्या काळात माझ्याबाबत वापरले गेलेले शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि वाईटही वाटले. राजकारणामध्ये सभ्यता आवश्यक आहे. ती एक प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, आम्ही माणूस नाही. पायलट यांनी पुढे म्हटले की, माझी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी भेट झाली. चर्चाही झाली. ही चर्चा अत्यंत निर्णायक आणि सकारात्मक झाली.

पुढे बोलताना पायलट यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात निलंबन, केस, कोर्ट कचेरी या सर्व गोष्टी घडल्या. या सर्व गोष्टी मला सकारात्मक आहेत असे मला कधीच वाटले नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्ही आमचे म्हणने पक्षासमोर मांडू इच्छितो. या संपूर्ण काळात मी किंवा माझ्या समर्थक आमदारांनी पक्ष किंवा पक्ष नेतृत्वावर कोणत्याही प्रकारची टीका अथवा विरोधात वक्तव्य करण्यात आले नाही. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: पायलट नसताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थान काँग्रेस सरकारचे विमान अस्थिर)

सचिन पायलट यांनी या वेळी सांगितले की, मी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा आभारी आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत चौकशी आणि चर्चा करण्यासाठी एक समिती बनवली आहे. नाय मिळेल. यात माझे व्यक्तिगत काहीच नाही. मी पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ येथे थांबलो. जे लोक माझ्यासोबत हते त्यांची काळजी घेणे आवश्यक होते. ज्या लोकांनी काठ्या झेलल्या, आपला घाम गाळला त्यासाठी त्यांना सत्तेत भागीदारी मिळवून देणे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी म्हटले होते की, सत्याला अडचणीत आणलं जाऊ शकतं पराभूत नाही.