राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष | (Photo courtesy: Lok Sabha TV)

Rahul Gandhi Attacks PM Modi On Rafale Deal: संसदेच्या हिवाळी अधिवेशानात लोकसभा सभागृहात राफेल मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल मुद्द्यावरुन सरकारवर आक्रमकपणे हल्ला करताना दिसले. आपल्या आक्रमक भाषणादरम्यान राफेल गैरव्यवहारातील कथीत टेप सभागृहात ऐकवण्यासाठी राहुल यांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्याकडे विनंती रुपात मागणी केली. परंतू, ही टेप अधिकृत नसल्याचे सांगत सभापतींनी राहुल यांना टेप चालवण्यास मन्यता दिली नाही.

दरम्यान, टेप चालवण्यास नकार मिळताच राहुल यांनी टेपमधील कथीत संभाषण वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यालाही अधिकृततेची जबाबदारी घ्या असे सांगत सभापतींनी नकार दर्शवला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्याला सरकारच्या वतीनेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने कामकाज सुरु ठेवणे कठीण झाले. त्यामुळे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याच निर्णय घेतला. (हेही वाचा, Rafale Deal प्रकरणी सारी कागदपत्र मनोहर पर्रिकर यांच्याकडे, केंद्र सरकारला Blackmail करत असल्याचा कॉंग्रेसचा दावा)

दरम्यान, राहुल यांच्या सभागृहात टेप चालवण्याच्या मागणीवर केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार आक्षेप घेतला. 'काँग्रेस सभागृहात एक बनावट टेप चालवण्याचा प्रयत्न करते आहे. पण, अशा प्रकारची टेप चालवण्याला सभापतींची मान्यता नसेल तर, काँग्रेस अशा प्रकारची टेप सभागृहात चालवू शकत नाही' असे जेटली म्हणाले. दरम्यान, काँग्रेस घाबरत आहे म्हणूनच या टेपची जबाबदारी घ्यायला नाकारत असल्याचा आरोपही जेटली यांनी या वेळी केला.