Goa health minister Vishwajit Rane with Manohar Parrikar (Photo credit: Twitter)

राफेल लढाऊ विमान खरेदी(Rafale Deal) प्रकरणावरून सध्या देशामध्ये वातावरण रंगायला सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आज कॉंग्रेसकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोहर पर्रिकर ( Manohar Parrikar) यांच्याकडे राफेल खरेदी कराराची कागदपत्र असल्याचं म्हटलं आहे. यावरूनच ते केंद्र सरकारला Blackmail करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

राफेल विमान प्रकरणात झालेल्या घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी उत्तर द्यावं असं म्हटलं आहे. तसेच गोव्याचे कॅबिनेट मंत्री विश्वजीत राणा यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये राफेल घोटाळ्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पर्रिकरांकडे या घोट्याळ्याच्या बाबतीचे तपशील असल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच या फाईल्स दाबून का ठेवण्यात आल्या आहेत याचं उत्तर द्यावं अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. Joint Parliamentary Committee स्थापन करूनच या राफेल भ्रष्टाचारातील सारे तपशील समोर येतील अशी कॉंग्रेसची भूमिका आहे.

आज दुपारी राहुल गांधी दिल्लीमध्ये राफेल विमान भ्रष्टाचार प्रकरणी बोलणार असल्याचं म्हटलं जात आहे.