राफेल विमान खरेदी व्यवहारात (Rafale Deal) आम्ही केवळ सत्य जाणून घेऊ इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) हे राफेल मुद्द्यावरुन पळ काढत आहेत. त्यांनी माझ्यासोबत राफेल मुद्द्यावर आमनेसामने फक्त 20 मिनिटे चर्चा करावी असे थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Congress President Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी यांना बुधवारी (2 जानेवारी) दिले. राफेल मुद्द्यावरुन लोकसभेत घमासान चर्चा झाल्यानंतर सभागृहाबाहेर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. या वेळी राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' असा पुनरुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारने अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या ज्या कंपनीला हे कंत्राट दिले त्या कंपनीने आयुष्यात विमान बनवले नाही. तरीसुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आले. पण, ज्या कंपनीला विमान बनविण्याचा 70 वर्षांचा अनुभव आहे त्या कंपनीला या कंत्राटातून वगळले. यातूनच पुढे येते की पंतप्रधान मोदी यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचा थेट फायदा मिळवून दिला.
अर्थमंत्री अरुन जेटली यांनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधी यांनी आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी म्हणाले, खोट बोलणे आणि आरोप करणे ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची जुनीच सवय आहे. संसदेमध्ये राफेल मुद्द्यावर चर्चा सुरु असताना देशाचे संरक्षण मंत्री शांत बसून असतात. या मुद्द्यावर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. अर्थमंत्री अरुण जेटली मात्र जोरदार भाषणबाजी करतात. मात्र, या व्यवहाराच्या निर्णय प्रक्रियेत असणारे पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री मात्र मौन बाळगून असतात, असे राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, राफेल घोटाळा टेप: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब)
Rahul Gandhi: I would very much like to debate one on one on the #RafaleDeal with the Prime Minister pic.twitter.com/yJcezHzGSF
— ANI (@ANI) January 2, 2019
दरम्यान, युपीएच्या काळात राफेल विमानाचे कंत्राट 526 कोटी रुपयांचे होते. एनडीएच्या काळात हेच कंत्राट 16 कोटींवर पोहोचले. ही रक्कमक इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलीच कशी? अनिल कंपनी यांच्या कंपनीने आयुष्यात विमान बनवले नाही. तरीसुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र, जी कंपनी गेली 70 वर्षे विमाने बनविण्याचा अनुभव आहे त्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले नाही. यावरुनच लक्षात येते की या प्रकरमात काहीतरी काळेबेरे आहे, असा पुनरुच्चा करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.